ATM फोडणारे दोघे हरियाणा, बैतूलमधून जेरबंद, रेकॉर्डब्रेक वेळेत उलगडा

By प्रदीप भाकरे | Published: May 19, 2023 08:51 PM2023-05-19T20:51:12+5:302023-05-19T20:51:27+5:30

जरूडमधील ATM चोरी, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, कार जप्त

Two ATM breakers jailed from Baitul, Haryana, unraveled in record-breaking time | ATM फोडणारे दोघे हरियाणा, बैतूलमधून जेरबंद, रेकॉर्डब्रेक वेळेत उलगडा

ATM फोडणारे दोघे हरियाणा, बैतूलमधून जेरबंद, रेकॉर्डब्रेक वेळेत उलगडा

googlenewsNext

जरूड, अमरावती: जरूड येथील एटीएम गॅसकटरने फोडून १६ लाख ४५ हजार रुपये कॅश चोरून परागंदा होणाऱ्या टोळीमधील दोघांना हरियाणा व मध्यप्रदेशातील बैतूल येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या आठवडाभरात ही रेकॉर्डब्रेक कारवाई केली.

कलीराम लक्ष्मण नागले (३५, रा. चकोर जि. बैतूल) व कैलाश इंदल पाल (४३, रा. बारीच जि. बैतूल) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पैकी एकाला हरियाणा राज्यातील उतावल जि. परवल येथून तर, दुसऱ्या आरोपीला बैतुल येथून ताब्यात घेण्यात आले. घटनेमध्ये एकुण पाच आरोपी सहभागी असल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले असून, पैकी तिघांची ओळख देखील पटली असून, ते पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात आहेत.

जरूड येथील एसबीआयचे एटीएम १२ मे रोजी पहाटे गॅस कटरचे सहाय्याने कापून रोख १६.४५ लाख रुपये चोरून नेले होते. त्या अनुषंगाने वरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश एलसीबीचे निरिक्षक तपन कोल्हे यांना दिले होती.

मोडस ऑपरेंडी अन् हरियाणा कनेक्शन

जरूडमधील एटीएम ज्या पद्धतीने तोडले, ती मोडस ऑपरेंडी हरियाणातील किंवा गुन्हा करून हरियाणात दडून बसलेल्या आरोपींची असल्याचे कोल्हे यांच्या लक्षात आले. त्यानुसार, एक पथक हरियाणात पाठविण्यात आले. त्या पथकाने वेषांतर करून व चार ते पाच दिवस भटकंती करत हरियाणातील उतावल येथून एका आरोपीला अटक केली. त्याला घेऊन एलसीबीचे पथक शुक्रवारी अमरावतीत पोहोचले. तर एलससीबीच्या दुसऱ्या पथकाने अन्य एका आरोपीला बैतुलणमधून अटक केली.

असा झाला उलगडा

गुन्ह्यात वापरलेली कार दोन दिवसांपूर्वी बैतूल येथे, तसेच घटनेच्या दिवशी वरुड शहरामध्ये फिरत होती. असा धागा हाती आला. त्यावरुन सिसिटीव्ही फुटेजचा माग काढून हरियाणा व बैतूल गाठण्यात आले. आरोपींकडुन गुन्हयात वापरलेली विना क्रमांकाची लाल कार जप्त करण्यात आली. सपोनि रामेश्वर धोंडगे, पोउपनि संजय शिंदे, नितीन चुलपार, अंबक मनोहर, संतोष मुंदाणे, रविन्द्र बावणे, बळवंत दाभणे, सुनिल महात्मे, शेख अजमत अमोल केन्द्रे, निलेश डांगोरे, युवराज मानमोटे, रवि व-हाडे, सागर नाचे, हर्षद घुसे, प्रमोद शिरसाट, राजेश सरकटे यांनी केली.

Web Title: Two ATM breakers jailed from Baitul, Haryana, unraveled in record-breaking time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.