सराईत चोराकडून दोन दुचाकी जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By प्रदीप भाकरे | Published: May 3, 2023 05:27 PM2023-05-03T17:27:51+5:302023-05-03T17:28:09+5:30

पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला वाहनचोरीच्या घटनांचा उलगडा करण्याचे निर्देश दिले होते.

Two bikes seized from Sarait thief; Action by local crime branch | सराईत चोराकडून दोन दुचाकी जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सराईत चोराकडून दोन दुचाकी जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

googlenewsNext

प्रदीप भाकरे 

अमरावती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून दुचाकी चोरणाऱ्या मध्यप्रदेशमधील एका सराईत चोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ मे रोजी शिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहिरम मार्गावरून अटक केली. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. राकेश उर्फ पप्पू मधू बिसोने (२२) रा. जामझिरी, मध्यप्रदेश असे अटक चोराचे नाव आहे.             

पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला वाहनचोरीच्या घटनांचा उलगडा करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या तपास करीत होते. तपासादरम्यान दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात मध्यप्रदेश येथील राकेश उर्फ पप्पू याचा हाथ असल्याचे समोर आले. तो सद्यस्थितीत दुचाकी चोरीच्या प्रयत्नात शिरजगाव कसबा ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याची माहितीही पथकाला मिळाली. त्या आधारावर पथकाने बहिरम मार्गावर सापळा रचून राकेश उर्फ पप्पूला अटक केली.

अकोला जिल्ह्यातही मारला हात

चौकशीदरम्यान त्याने दर्यापूर व तिवसासह अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पुढील कारवाईकरिता त्याला दर्यापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, त्र्यंबक मनोहर, सुनील महात्मे, सय्यद अजमत, नीलेश डांगोरे, अमोल केंद्रे, राहुल सोलव, चेतन गुल्हाने, सागर धापड यांनी ही कारवाई केली.

Web Title: Two bikes seized from Sarait thief; Action by local crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.