पुण्यात वाद मिटविणाऱ्या पोलीस निरीक्षकास केली मारहाण : दोघा भावांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 08:37 PM2019-07-05T20:37:43+5:302019-07-05T20:39:44+5:30
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी झालेला वाद मिटविणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास दोघा भावांकडून मारहाण केली.
पुणे : भवानी पेठेतील दुकानासमोरील जाहिरातीचा अनधिकृत बॅनर काढताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी झालेला वाद मिटविणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास दोघा भावांकडून मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या विद्रुपीकरणाचा गुन्हा खडक पोलीस ठाण्यात दाखल केला. ऱ्यां
गुन्हा दाखल केल्यानंतर दोघा भावांना अटक केली आहे. प्रज्वल राजेन्द्र बनकर (वय ३५), दिगंत राजेन्द्र बनकर (वय ३०, दोघेही रा. भवानी पेठ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गणेश माने यांनी फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानी पेठेमधील अनधिकृत फ्लेक्स, बॅनर काढण्याकरिता शुक्रवारी दुपारी बारा वाजता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक भवानी पेठेत गेले होते. त्यावेळी बनकर यांच्या ‘भवानी हार्डवेअर’ या दुकानासमोरील सार्वजनिक ठिकाणावर त्यांच्या दुकानाचे लावलेले बॅनर अतिक्रमण विभागाचे कर्मचारी काढत होते. त्यावेळी दोन्ही भावानी कर्मचा-यांनी शिविगाळ करीत बॅनर काढण्यापासून रोखले. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक गणेश माने व बीट मार्शल पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रज्वल व दिगंत यांनी माने यांनाही शिविगाळ करीत धक्काबुक्की केली.