विषारी फळामुळे दोन मुलांचा मृत्यू; कुटुंबीयांना जादुटोण्याचा संशय, पण आमदार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 10:05 PM2020-02-15T22:05:28+5:302020-02-15T22:07:52+5:30

शुक्रवारी रात्री गजोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कदमताली गावात ही घटना घडल्याचे एका पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

Two children died of poisonous fruit; Family suspected of witchcraft, but MLA saying ... | विषारी फळामुळे दोन मुलांचा मृत्यू; कुटुंबीयांना जादुटोण्याचा संशय, पण आमदार म्हणतात...

विषारी फळामुळे दोन मुलांचा मृत्यू; कुटुंबीयांना जादुटोण्याचा संशय, पण आमदार म्हणतात...

Next
ठळक मुद्दे शुक्रवारी सायंकाळी सर्व मुले जंगलातून परत आल्यानंतर बेशुद्ध पडली अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.  दोन मुलांचा मृत्यू झाला, तर इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. यानंतर त्यांनी त्याला रुग्णालयात नेले. मुलांवर जादूटोणा झाल्याचे मुलांच्या कुटुंबियांनी सांगितले.

मालदा -  पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात मुलांवर जादूटोणा झाल्याने दोन मुले मरण पावली आणि दोन इतर आजारी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार असल्याचा दावा मुलांची नातेवाईकांनी केला आहे. शुक्रवारी रात्री गजोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कदमताली गावात ही घटना घडल्याचे एका पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक आलोक रजोरिया म्हणाले की, 'मृत मुले पाच ते सात वयोगटातील तर तीन व सहा वर्षाच्या दोन बहिणींना मालदा मेडिकल कॉलेज व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपास सुरू करण्यात आला असून मृत्यूचे कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. ही मुले जवळच्या जंगलात खेळायला गेली होती. त्यावेळी मुलांनी जंगलातून काही विषारी फळ खाल्ली होती. शुक्रवारी सायंकाळी सर्व मुले जंगलातून परत आल्यानंतर बेशुद्ध पडली अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 

दुसरीकडे, मुलांवर कोणीतरी जादूटोणा केल्याच्या संशयाने कुटुंबीयांनी अशा परिस्थितीत त्यांना तांत्रिकांकडे नेले, तेथे दोन मुलांचा मृत्यू झाला, तर इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. यानंतर त्यांनी त्याला रुग्णालयात नेले. मुलांवर जादूटोणा झाल्याचे मुलांच्या कुटुंबियांनी सांगितले. त्याचवेळी टीएमसीच्या स्थानिक आमदार दीपाली बिस्वास यांनी शनिवारी गावाला भेट दिली आणि रुग्णालयात जाऊन मुलांच्या भेटी घेतल्या. त्या म्हणाल्या की, 'ही अंधश्रद्धेची बाब आहे. कुटुंबीयांनी तांत्रिकाऐवजी डॉक्टरकडे नेले असते तर मुले वाचली असती. मी गावकऱ्यांना आवाहन केले आहे की, अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, वैद्यकीय पथक गावात पाठविण्यात आले आहे.

Web Title: Two children died of poisonous fruit; Family suspected of witchcraft, but MLA saying ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.