पोहण्याची हौस जिवावर बेतली; ठाण्यात खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 04:08 PM2021-12-05T16:08:44+5:302021-12-05T16:09:17+5:30
दोघे मित्र रामबाग येथील पाण्याने भरलेल्या खड्डयामध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुले या खड्डयामध्ये बुडाली होती.
लोकमत न्युज नेटवर्क
ठाणे: शिवाईनगर जवळील हवाई दलाच्या मैदानातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून अभिषेक बबलु शर्मा (वय - ११ राहणार:- दुर्गाचाळ, रामबाग, उपवन, ठाणे) कृष्णा मनोज गौड (वय- ११ , रा - कृष्णाचाळ, रामबाग, उपवन, ठाणे ) या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास घडली. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले.
हे दोघे मित्र रामबाग येथील पाण्याने भरलेल्या खड्डयामध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुले या खड्डयामध्ये बुडाली होती. घटनास्थळी वर्तकनगर पोलीस कर्मचारी, आ. व्य. कक्ष कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते.
आ. व्य. कक्ष कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी यांच्या मदतीने त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. हे मृततदेह उत्तरीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.