महिलेसह दोन मुलांना भररस्त्यात लाठ्या-काठ्याने मारहाण; मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतीय व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 03:16 PM2021-08-05T15:16:48+5:302021-08-05T15:17:36+5:30

video get viral of openly beating of woman and two youths : व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Two children, including a woman, were beaten with sticks; The video went viral | महिलेसह दोन मुलांना भररस्त्यात लाठ्या-काठ्याने मारहाण; मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतीय व्हिडीओ

महिलेसह दोन मुलांना भररस्त्यात लाठ्या-काठ्याने मारहाण; मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतीय व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्देएक व्हिडिओ 34 सेकंदांचा आहे आणि दुसरा एक मिनिट 41 सेकंदांचा आहे. 34 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एका माणसाने लोकांच्या गर्दीतच एका महिलेला लाठ्याकाठ्याने मारहाण केल्याचे दिसून येते.

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एक महिला आणि दोन तरुणांना लाठ्या -काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ कैराना परिसरातील एका गावाचा आहे, जो सुमारे १५ दिवस जुना आहे. व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


बुधवारी याच प्रकरणाशी संबंधित दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. एक व्हिडिओ 34 सेकंदांचा आहे आणि दुसरा एक मिनिट 41 सेकंदांचा आहे. 34 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एका माणसाने लोकांच्या गर्दीतच एका महिलेला लाठ्याकाठ्याने मारहाण केल्याचे दिसून येते. ती महिला रडत आहे आणि आपला जीव वाचवण्याची विनवणी करत आहे, परंतु कोणीही मदतीसाठी येत नाही. त्याचवेळी, दुसरा व्हिडिओ देखील त्याच प्रकरणाशी निगडित आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुणांना काठ्यांनी मारहाण केली जात आहे. खाटांवर उलटे झोपवून तरुणांना लाठ्या -काठ्यांनी मारहाण केली जात आहे. आजूबाजूला उभी असलेली गर्दी दोन्ही तरुणांना अमानुष मारहाण पाहत आहे. मारहाणीदरम्यान कोणीतरी मोबाईलवरून व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे सांगण्यात आले आहे.


कोतवाली प्रभारी सांगतात की, व्हायरल झालेला व्हिडीओचा तपास केला जात आहे. त्याची चौकशी केली असता ती घटना परिसरातील एका गावातील असल्याचे निष्पन्न झाले. माहिती घेताना कळले की, या गावात पीडित महिलेचे सासर आहे. ती मुझफ्फरनगर जिल्ह्यातील गावातील रहिवासी आहे. तिच्या गावातील तरुण आपल्या मित्रासह महिलेला भेटण्यासाठी आले होते. सासरच्यांनी दोन्ही तरुणांना पकडून ठेवले होते. त्याचवेळी सासरच्यांनी दिलेल्या माहितीवरून महिलेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी येऊन तरुण आणि महिलेला मारहाण केली. व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल. एसपी सुकिर्ती माधव सांगतात की, ही बाब अद्याप निदर्शनास आलेली नाही. जर असे प्रकरण असेल तर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.

Web Title: Two children, including a woman, were beaten with sticks; The video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.