Sushant Singh Rajput case: सुशांतच्या हत्येमागे दोन 'डॅडी'; जिम पार्टनर मित्राचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 04:25 PM2020-08-24T16:25:03+5:302020-08-24T16:25:37+5:30
Sushant Singh Rajput case: सुशांतसोबत नेहमी भेट होत होती. जिममध्ये नेहमी आम्ही एकत्र व्यायाम करायचो. सुशांतची मानसिक स्थिती पूर्णपणे ठीक होती. तो मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंटही घेत होता, असे सुशांतच्या मित्राने सांगितले.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या कथित आत्महत्या प्रकरणात आता मोठमोठे खुलासे होऊ लागले आहेत. कधी वकील, कधी बहीण तर कधी मित्र वेगवेगळे दावे करू लागले आहेत. यामुळे सीबीआय जरी या प्रकरणाचा तपास करत असली तरीही खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचणे कठीण जाणार आहे. यातच आज सुशांतच्या जिम पार्टनरने मोठा खळबळजनक दावा केला आहे. सुशांतच्या हत्येच्या कटामागे दोन डॅडींचा हात असल्याचा आरोप त्याने केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुशांत राजपूतचा मित्र आणि जिम पार्टनर सुनील शुक्ला याने हा नवा दावा केला आहे. हे दोन डॅडी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून रिया चक्रवर्तीचे (Rhea Chakroborthy) वडील इंद्रजीत आणि निर्माते महेश भट(Mahesh bhat) असल्याचे शुक्ला याने म्हटले आहे.
सुनीलने सांगितले की, मि. चक्रवर्ती त्यांची मुलगी रियाच्या माध्यमातून सुशांतला औषधे देत होते. 8 जूनला जेव्हा रियाने सुशांतचे घर सोडले त्यानंतर कोणीतरी सुशांतला ही औषधे देत होता. तो संजय, नीरज किंवा सिद्धार्थ असू शकतो. या तिघांपैकी कोणीतरी नक्कीच सुशांतला औषध देत होता. माझा मित्र कधी डिप्रेशनमध्ये नव्हता. ही औषधे तो विश्वासाच्या आधारावर घेत राहिला.
Video: अंतराळात खळबळ उडाली! पृथ्वीवर एकाचवेळी पाच UFO दिसले; रशियाने टिपले
सुशांतसोबत नेहमी भेट होत होती. जिममध्ये नेहमी आम्ही एकत्र व्यायाम करायचो. सुशांतची मानसिक स्थिती पूर्णपणे ठीक होती. तो मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंटही घेत होता, असे सुनिलने सांगितले.
काही दिवसांपूर्वी सुनिलने आरोप केला होता की, सुशांतला बॉलिवूड इंडस्ट्रीमधून त्रास देण्यात येत होता. काही लोक त्याचे करिअर संपविण्याचा प्रयत्न करत होते. एका अवॉर्ड शोमध्ये शाहरूख खानने धोकेबाजी करून बोलविले होते आणि नंतर त्याचा अपमानही केला होता. तसेच सलमान आणि करण जोहरने मिळून सुशांतचे करिअर बरबाद करण्याचा कट रचला होता.
चावीवाल्याचा खुलासा...
चावीवाल्याला १४ जून रोजी जेव्हा दरवाज्याचा लॉक उघडण्यासाठी बोलवण्यात आलं तेव्हा त्याला हे माहीत नव्हतं की, हे सुशांत सिंह राजपूतचं घर आहे. त्याने सांगितले की, सिद्धार्थ पिठानीने त्याला फोन केला होता. दरवाज्याचं लॉक उघडताच त्याला लगेच २ हजार रूपये दिले गेले आणि त्याला लगेच जाण्यासाठी सांगण्यात आले. लॉक कॉम्प्युटराइज्ड होतं. ते त्याला हातोड्याने तोडावं लागलं. लॉक तोडल्यावर त्याला २ हजार रूपये देऊन लगेच जाण्यास सांगण्यात आलं. त्याला रूममध्ये जाण्यास मनाई केली होती. त्याला तेथून दूर करण्यात आलं होतं.
राऊत काय म्हणालेले?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये अनेक आरोप केले आहेत. बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे हे भाजपाचे नेते आहेत आणि 2009मध्ये त्यांच्यावर आरोप लावण्यात आले होते, असा आरोपही त्यांनी केला आहे.सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुसऱ्या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे' असं म्हणत संजय राऊत यांनी बिहार पोलिसांवर निशाणा साधला आहे.
१७ कोटींपैकी १५ कोटींचे व्यवहार संशयास्पद
सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी त्याच्या खात्यात १७ कोटी होते. त्यापैकी १५ कोटी त्याचा संबंध नसलेल्या खात्यात वळते झाले. यात सुशांतचे क्रेडिट, डेबिट कार्ड रियाकडेच होते. त्यामुळे तिने आणि तिच्या कुटुंबाने पैसे खर्च केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
IPL 2020 ला मोठा झटका; तगडा स्वदेशी स्पॉन्सर गमावला
CPL 2020 : मुन्रो, ब्राव्हो, पोलार्डनं धू धू धुतलं; शाहरुख खानच्या संघाची विजयाची हॅटट्रिक
किम जोंग उन कोमात, बहीण उत्तर कोरियाची सत्ताधारी; माजी सहकाऱ्याचा गौप्यस्फोट
Gold Rates सोने खरेदी करायचेय? जाणून घ्या योग्य वेळ अन् साधा संधी
युद्धाचे संकेत? चीनसोबत चर्चा फिस्कटली तर सैन्य कारवाईचा विचार; सीडीएस बिपीन रावत यांचा इशारा