काय सांगता? ईडीचे दोन अधिकारी लाच घेताना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 11:16 AM2021-07-03T11:16:53+5:302021-07-03T11:20:57+5:30
व्यापाऱ्याकडून घेतले पाच लाख रुपये
अहमदाबाद : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) दोन अधिकाऱ्यांना केंद्रीय गुप्तचर खात्याच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच लाख रूपयांची लाच घेताना अटक केली, असे अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले.
ईडीच्या अहमदाबाद झोनल कार्यालयात उप संचालक पूरन काम सिंह आणि सहायक संचालक भूवनेश कुमार यांना एका व्यापाऱ्याकडून पाच लाख रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले, असे सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. सिंह आणि कुमार यांनी ७५ लाख रूपयांची लाच मागितली होती. नंतर व्यवहार पाच लाख रूपयांत ठरला, असे अधिकारी म्हणाला. या दोघांना पकडण्यासाठी एस. एस. भादोरिया, हिमांशू शहा, एन. के. वर्मा आणि अभिमन्यू सिंह या अधिकाऱ्यांनी सापळा लावला होता. लाचलुचपत विभागाच्या या मोठ्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.