तीन कामगारांच्या मृत्युप्रकरणी ठेकेदाराच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 09:56 PM2019-01-18T21:56:18+5:302019-01-18T21:57:21+5:30
मीरारोडच्या जुनी म्हाडा वसाहतमागे पालिकेचे मलनिस्सारण केंद्र देखभाल व व्यवस्थापने साठी एसपीएमएल इन्फ्रा या ठेकेदार कंपनीस दिले आहे. बुधवारी या केंद्रातील पॉकलेटर ड्रेन चेंबर साफ करण्यासाठी गेलेल्या मुझफ्फर मोहलिक (२४), अब्दुल रफिक मंडल (५५) व मफिजुल मीराज मंडल (१९) या तीन कामगारांचा वायुने गुदमरुन व टाकीतील सांडपण्यात बुडून मृत्यु झाला होता.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रातील टाकी सफाईच्या कामादरम्यान तीन कामगारांच्या मृत्युप्रकरणी काशिमीरा पोलीसांनी ठेकेदाराच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपींना आज पोलीसांनी अटक केली आहे.
मीरारोडच्या जुनी म्हाडा वसाहतमागे पालिकेचे मलनिस्सारण केंद्र देखभाल व व्यवस्थापने साठी एसपीएमएल इन्फ्रा या ठेकेदार कंपनीस दिले आहे. बुधवारी या केंद्रातील पॉकलेटर ड्रेन चेंबर साफ करण्यासाठी गेलेल्या मुझफ्फर मोहलिक (२४), अब्दुल रफिक मंडल (५५) व मफिजुल मीराज मंडल (१९) या तीन कामगारांचा वायुने गुदमरुन व टाकीतील सांडपण्यात बुडून मृत्यु झाला होता.
स्थानिक रहिवाशांसह शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांनी या घटनेस महापालिका व ठेकेदाराचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप करत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. तर पालिकेस सतत तक्रारी करुन सुध्दा डोळेझाक केल्याचा आरोप रहिवाशांनी केला. महापौर डिंपल मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांना सुध्दा रहिवाशांच्या रोषास सामोरे जावे लागले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजना मोकलीकर यांच्या फिर्यादी नंतर ठेकेदार कंपनीचे मलनिस्सारण केंद्र प्रमुख नरेंद्र अंतड, सुपरवायझर प्रिन्स संतोष सिंग व उपठेकेदार अंडवरा बीबी पथर या तीघां विरोधात तीन कामगारांच्या मृत्युस जबाबदार असल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी अंतड व सिंग या दोघा आरोपींना अटक केली आहे. तर पथर चा शोध सुरु आहे. कामगारांना सुरक्षेची कोणतीच साधने ठेकेदाराने उपलब्ध करुन दिली नव्हती. त्यांना कामाची माहिती व प्रशिक्षण दिले गेले नव्हते. सदर कामगारा नाक्या वरुन आणण्यात आल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. पालिकेचे मलनिस्सारण प्रकल्पाचे अभियंता विश्वनाथ देशमुख , शहर अभियंता शिवाजी बारकुंड व वाकोडे यांनी सुध्दा रहिवांच्या तक्रारीसह येथील कामकाजा कडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर सुध्दा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. महत्वाचे म्हणजे आयुक्तांनी बारकुंड यांना चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यास सांगीतले असता त्यांनी चौक शीच केली नसुन गुन्हा देखील पोलीसांच्या फिर्यादीवरुन स्वत: निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दाखल केला आहे.