दोन अभियंत्यांची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 06:00 AM2019-03-22T06:00:47+5:302019-03-22T06:01:15+5:30
ऐन होळी सणाच्या दिवशी शहरातील म्हसरूळ व सिडको परिसरात दोन अभियंत्यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
नाशिक - ऐन होळी सणाच्या दिवशी शहरातील म्हसरूळ व सिडको परिसरात दोन अभियंत्यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
सीडीओ मेरी कार्यालयात अभियंता म्हणून नोकरीस असलेले शिवाजी चौघुले (५७) यांनी म्हसरूळ येथे राहत्या घरी आजारपणाला कंटाळून गळफास घेतला. चौघुले यांनी आत्महत्येपूर्वी आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळून आली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सिडको परिसरातील उपेंद्रनगर येथे राहणाऱ्या अतुल देशमुख (२४) या तरुण अभियंत्याने बुधवारी होळीच्या दिवशी गळफास घेतला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अतुलच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही.