नागरिकांना गंडा घालणारे दोन तोतया पोलीस गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 21:08 IST2019-08-26T21:07:01+5:302019-08-26T21:08:51+5:30
नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करत गंडा घातला आहे .

नागरिकांना गंडा घालणारे दोन तोतया पोलीस गजाआड
कल्याण - कल्याणच्या स्कायवोक वर स्वतः नागरिकांच्या खिशात गांजा ठेवून त्यांना लुटणाऱ्या दोन तोतया पोलिसांना कल्याण च्या महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अटक केली आहे. अमित नार्वेकर व प्रशांत सतविडकर असे या तोतया पोलिसांची नाव असून या दोघांनी अनेक नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करत गंडा घातला आहे .
कल्याण पश्चिमेकडील स्टेशन परिसरतील स्कायवॉकवर नागरिकांना गंडा घालत लुबाडणारी टोळी सक्रिय झाली होती. विशेष म्हणजे दोन जणांची ही टोळी स्वतःला पोलीस असल्याची बतावणी करत नागरिकांना लुबाडत होते. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांसमोर या दोघा भामट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी या दोघांना अटक केली. अमित आणि प्रशांत हे दोघे रात्री स्कायवॉकवर उभे राहायचे. आपण पोलीस असल्याची बतावणी करत स्कायवॉकवरून जाणाऱ्या इसमाला लक्ष करत त्याला थांबवून तपासणीच्या बहाण्याने त्याच्याजवळ गांजा टाकत तुझ्याकडे गांजा सापडल्याचे भासवून त्याला लुबाडायचे या दोघांनी आतापर्यंत अनेक लोकांना गंडा घातला असून पोलीस तपासादरम्यान त्यांच्या कडून 6 गुन्हे उघडकीस आले आहेत