हॉटेलमध्ये जेवणाचे बिल भरण्यावरून दोन मित्रांवर चाकू हल्ला, एक गंभीर; संशयित मुख्य आरोपीसह आणखी एकास घेतले ताब्यात

By संजय पाटील | Published: April 29, 2023 05:57 PM2023-04-29T17:57:08+5:302023-04-29T18:00:22+5:30

ही घटना २८ तारखेच्या रात्री गलवाडे रोडवर घडली होती...

Two friends stabbed, one seriously, over hotel meal bill; Suspected main accused along with one more was taken into custody | हॉटेलमध्ये जेवणाचे बिल भरण्यावरून दोन मित्रांवर चाकू हल्ला, एक गंभीर; संशयित मुख्य आरोपीसह आणखी एकास घेतले ताब्यात

हॉटेलमध्ये जेवणाचे बिल भरण्यावरून दोन मित्रांवर चाकू हल्ला, एक गंभीर; संशयित मुख्य आरोपीसह आणखी एकास घेतले ताब्यात

googlenewsNext

 
अमळनेरमधील एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर, बिल देण्याच्या वादातून एकाने दोन मित्रांवर चाकू हल्ला केल्याची घटना २८ तारखेच्या रात्री गलवाडे रोडवर घडली होती. आता याप्रकरणी पोलिसांनी संशयित मुख्य आरोपीसह आणखी एकाला ताब्यात घेतले आहे.

ऋषिकेश श्याम सोनार (वय २२, रा. पैलाड अमळनेर) , तेजस रवींद्र पाटील (वय २२, रा. मिल कंपाऊंड) हे गलवाडे रोडवर एका हॉटेल मध्ये जेवणासाठी गेले. तेथे  देवीचे दर्शन करून गलवाडे येथील रहिवासी दादू पाटील आला व त्याने दोघांशी बिल भरण्यावरून  वाद घातला. दोघांनी बिल भरण्यास नकार दिल्यावरून दादूने  त्यांच्या पोटावर चाकू हल्ला केला. यात ऋषिकेश सोनार गांभीर जखमी आहे. धुळे सिव्हिलला बेशुद्ध अवस्थेत आहे. तर तेजस पाटीलही जखमी आहे. 

दादू रात्रीच नाशिक येथे पळून गेला. त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि पोलीस पथकातील योगेश महाजन, निलेश मोरे, घनश्याम पवार, गणेश पाटील यांनी आरोपी दादूला त्याचा मित्र दीपक बोरसे याच्या घरातून अटक केली आहे.

दादू पाटील याचे स्टेटस ही हिंसक -
मुख्य आरोपी दादू पाटील याने आपल्या फेसबुक वर  'इमानदारी की चादर ओढी है, पर जिस दिन दिमाख सटका ना, इतिहास तो इतिहास भूगोल ही बदल देगे’, असे हिंसक स्टेटस ठेवले आहे.
 

Web Title: Two friends stabbed, one seriously, over hotel meal bill; Suspected main accused along with one more was taken into custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.