गणेशोत्सवाचे बॅनर लावण्यावरून दोन गणेश मंडळे भिडली; केज येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 07:04 PM2018-09-10T19:04:15+5:302018-09-10T19:07:20+5:30
मंगळवार पेठेच्या काॅर्नर वरील स्वामी समर्थ मठाच्या कमानीवर गणेश मंडळाचे बँनर लावण्याच्या कारणावरून वाद झाला
केज (बीड ) : शहरातील मंगळवार पेठेच्या काॅर्नर वरील स्वामी समर्थ मठाच्या कमानीवर गणेश मंडळाचे बँनर लावण्याच्या कारणावरून दोन गणेश मंडळाचे कार्यकर्ते रविवारी रात्री आपसात भिडले. यात दोन्ही गटातील युवक जखमी झाले. या प्रकरणी दोन्ही गटाच्या १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंगळवार पेठेच्या काॅर्नरवर स्वामी समर्थ यांच्या मठाच्या नावाची कमान आहे या कमानीवर एका गणेश मंडळांनी बँनर लावले होत. मात्र गेल्या दोन तीन वर्षांपासून या कमानीवर बँनर लावत असलेल्या गणेश मंडळाने यावर आक्षेप घेतला. याचेच पर्यावसन हाणामारीत झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपाने हा वाद मिटला. मात्र यात फायटर , काठ्या , दगडाने मारल्याने दोन्ही गणेश मंडळांच्या दोन कार्यकर्त्याचे डोके फुटले.
या प्रकरणी समिर शामराव गुंड यांच्या तक्रारी वरुन चंद्रकांत लोंढे , अशोक लोंढे , रवी लोंढे , पोपट लोंढे , राहुल गोरे , विकी लोंढे , संदीप लोंढे , संतोष लोंढे , गणु लोंढे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर संदीप विष्णू लोंढे यांच्या तक्रारी वरुन समीर शामराव गुंड , प्रशांत राजेभाऊ गुंड ,अशिष बाळासाहेब गुंड ,सुरज दिलीपराव गुंड , विशाल संदिपान गुंड , अतुल अभिमान गुंड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार डोंगरे व माळी करत आहेत.