मुंबई ठाण्यातून हद्दपार केलेल्या दाेन गुंडांना पुन्हा अटक, मनाई आदेशाचा केला भंग
By जितेंद्र कालेकर | Published: December 28, 2023 08:55 PM2023-12-28T20:55:44+5:302023-12-28T21:05:24+5:30
कळवा, वर्तकनगर पाेलिसांनी केली कारवाई
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुंबई, ठाण्यासह चार जिल्हयातून दाेन वषार्करीता हद्दपार केलेल्या आशिष रमेश सुरी (२४, रा. विटावा, कळवा, ठाणे) आणि दिपक सिताराम धनवाल ( ३०, रा.लोकमान्यनगर पाडा क्रमांक ३, ठाणे) या दाेघांना अनुक्रमे कळवा आणि वर्तकनगर पाेलिसांनी अटक केल्याची माहिती गुरुवारी दिली. या दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष सुरी याच्यावर हाणामारीचे अनेक गुन्हे दाखल असल्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा बसण्यासाठी परिमंडळ एकचे पाेलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी त्याला ठाणे, मुंबई, पालघर आणि रायगड या जिल्हयातून दाेन वषार्ंच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश ७ जुलै २०२२ राेजी दिले हाेते. त्याने याच आदेशाचा भंग करुन ताे कळव्यातील विटावा भागात िफरत असल्याची माहिती कळवा पाेलिसांना मिळाली. त्याच आधारे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक कन्हैया थाेरात यांच्या पथकाने त्याला २८ डिसेंबर २०२३ राेजी पहाटे २.५० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले.
२८ डिसेंबर २०२३ रोजी २ वाजून ५० मि.चे सुमारास, विटावा नाका, कळवा, ठाणे पश्चिम येथे कळवा पोलीस ठाणेचे पथकास मिळुन आला. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशीच कारवाई वर्तकनगर पाेलिसांनी दिपक धनवाल या आराेपीविरुद्ध केली. त्याला ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड या पाच जिल्हयातून दाेन वषार्साठी हद्दपार करण्याचे आदेश ७ जून २०२३ राेजी वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिले हाेते. ताे या आदेशाचा भंग करुन लाेकमान्यनगर भागात फिरतांना आढळल्याने त्याला वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सदाशिव निकम यांच्या पथकाने २७ डिसेंबर २०२३ राेजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्धही कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.