वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोघींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 11:30 PM2019-11-29T23:30:33+5:302019-11-29T23:31:04+5:30

गोड बोलून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन पीडित तरुणींची मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ससूनवघर गावच्या हद्दीतील एका ढाब्यावरून गुरु वारी संध्याकाळी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सुटका केली आहे.

Two girl rescued who brought in for prostitution business | वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोघींची सुटका

वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोघींची सुटका

Next

नालासोपारा : गोड बोलून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन पीडित तरुणींची मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ससूनवघर गावच्या हद्दीतील एका ढाब्यावरून गुरु वारी संध्याकाळी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सुटका केली आहे. यासाठी प्रवृत्त करणाऱ्या एका महिलेवर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी अंजुकुमारी रॉबिन यादव (२३) ही ठाणे आणि मीरा रोड परिसरातून ३२ ते ३७ वयोगटातील दोन पीडित तरुणींना वेश्या व्यवसायासाठी ससूनवघर गावाच्या हद्दीतील न्यू काठियाड ढाब्यामध्ये घेऊन आल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अंजुकुमारी हिला यासाठीचे कमिशन घेताना रोख रकमेसह रंगेहाथ पकडून त्या दोघींची सुटका केली आहे.
 

Web Title: Two girl rescued who brought in for prostitution business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.