उल्हासनगरातील निरीक्षण गृहातून २ मुली पळाल्या, हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 07:22 PM2022-04-14T19:22:16+5:302022-04-14T19:45:16+5:30
Two girls escaped from observation house in Ulhasnagar : याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-५ तहसील कार्यालय परिसरातील शासकीय मुलीचे निरीक्षणगृह आणि विशेषगृहामधून मंगळवारी रात्री १६ व १५ वर्षाच्या दोन मुली पळून गेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर तहसील कार्यालय परिसरात शासकीय मुलीचे निरीक्षणगृह व विशेषगृह असून त्यामध्ये पोलिसांनी पकडून आणलेल्या मुलींना देखरेखीखाली ठेवले जातात. मंगळवारी रात्री साडे सात वाजता १५ व १६ वर्षाच्या दोन मुलींनी कोणालाही न सांगता पळून गेल्या. निरीक्षणगृहाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना नंतर माहिती मिळल्यावर त्यांनी हिललाईन पोलीस ठाणे गाठून मुली पळून गेल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.