२ मुलींना चार वर्षांपासून बंधक बनवून केला बलात्कार, पोलिसांनी सुटका केल्यानंतर अश्रू झाले अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 09:53 PM2022-02-02T21:53:58+5:302022-02-02T21:54:17+5:30

Rape Case : मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आता त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

Two girls have been held hostage for four years and raped | २ मुलींना चार वर्षांपासून बंधक बनवून केला बलात्कार, पोलिसांनी सुटका केल्यानंतर अश्रू झाले अनावर

२ मुलींना चार वर्षांपासून बंधक बनवून केला बलात्कार, पोलिसांनी सुटका केल्यानंतर अश्रू झाले अनावर

Next

नोएडामधून एक घृणास्पद घटना समोर आली आहे. येथे दोन मुलींना बंधक बनवून त्यांच्यावर अनेकवेळा बलात्कार करण्यात आला. एका एनजीओच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही मुलींची सुटका केली. मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आता त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

सनवर्ल्ड वनालिका सोसायटीत मुलींना ओलीस ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून महिला पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांनी कारवाई केली. नवीन गुप्ता नावाच्या व्यक्तीच्या फ्लॅट क्रमांक 201 टॉवर क्रमांक 2 मधून पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली. दोन्ही मुली आसाममधील दिसपूर येथील रहिवासी असून त्यांना चार वर्षांपासून ओलीस ठेवण्यात आले होते. पीडितेने पोलिसांना सांगितले की, नवीन गुप्ता नावाच्या व्यक्तीने तिला ओलीस ठेवले होते आणि तिच्यावर अमानुष वागणूक, लैंगिक छळ, बलात्कार आणि अत्याचार केले गेले. दोन्ही मुलींना वेळेवर पगार न दिल्याने पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंड बदला, एक्स बॉयफ्रेंडने 2 तरुणांची हत्या करून मृतदेह पुरला

पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत

मुली खूप घाबरल्या असून त्यांचे समुपदेशन केले जात आहे. याप्रकरणी कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

Web Title: Two girls have been held hostage for four years and raped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.