डोंबिवली रेल्वे स्थानकात आरक्षण तिकिट घरात दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:26 PM2017-12-18T12:26:49+5:302017-12-18T12:32:04+5:30

लांबपल्याच्या गाडीचे तिकिट आरक्षण करण्यासाठी रांग लावण्यावरुन झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारी घडल्याची घटना डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या आरक्षण तिकिटा कार्यालयात रविवारी मध्यरात्री घडली. त्या हाणामारीत एका व्यक्तिच्या डोक्याला जखम झाली असून त्या घटनेतील तिघा हल्लेखोरांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली असून त्यात दोन महिलांचा तर एका पुरुषाचा समावेश आहे.

Two group clash in Reservation ticket house at Dombivli railway station | डोंबिवली रेल्वे स्थानकात आरक्षण तिकिट घरात दोन गटात हाणामारी

डोंबिवली रेल्वे स्थानकात आरक्षण तिकिट घरात दोन गटात हाणामारी

Next
ठळक मुद्देदोन महिलांसह एका पुरुष हल्लेखाराला अटक लोहमार्ग पोलिसांची कारवाई

डोंबिवली: लांबपल्याच्या गाडीचे तिकिट आरक्षण करण्यासाठी रांग लावण्यावरुन झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारी घडल्याची घटना डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या आरक्षण तिकिटा कार्यालयात रविवारी मध्यरात्री घडली. त्या हाणामारीत एका व्यक्तिच्या डोक्याला जखम झाली असून त्या घटनेतील तिघा हल्लेखोरांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली असून त्यात दोन महिलांचा तर एका पुरुषाचा समावेश आहे.
लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांनी दिलेल्या माहितीनूसार मिथिलेश मिश्रा व महेंद्रा मिश्रा या दोन महिलांसह अखिलेश गुप्ता या पुरुष हल्लेखोराला अटक करण्यात आली असून तिघेही डोंबिवलीचेच रहिवासी आहेत. त्यांच्या विरोधात सुरज गुप्ता याने पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून त्यावरुन चौकशी केली असता हल्लेखोरांना अटक करण्यात आल्याचे हिरमेठ म्हणाले. रविवारी रात्री ११.३० वाजता स्थानकात पश्चिमेकडील आरक्षण तिकिट घरानजीक लांबपल्याच्या गाड्यांचे तिकिट काढण्यासाठी जी रांग लागते, त्या रांगेत उभे राहण्यावरुन महिलांमध्ये वाद झाला. त्यानंतर त्यांनी पुरुषांना बोलावले, त्यानंतर वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले,एकाला डोक्यात दगड मारण्यात आल्याने त्यास जखम झाल्याचे तक्रारदार गुप्ता याने सांगितले. मध्यरात्री उशिराने ही घटना घडल्यानंतर जखमीला तातडीने स्थानकातील फलाट क्रमांक १ वरील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, तेथेच उपचारही करण्यात आले असल्याचे हिरेमठ म्हणाले. त्यानूसार सोमवारी सकाळी घटनेची चौकशी, सीसी फुटेज बघितल्यानंतर सकाळी १०.३० च्या सुमारास गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच वरिल तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना कल्याण रेल्वे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच या घटनेचा पुढील तपास पोलिड निरिक्षक हरिदास डोळे करत आहेत.
* घटना घडली त्यावेळी आरक्षण तिकिट घराजवळ रेल्वे पोलिस दलाचे कर्मचारी नव्हते का? तसेच आरक्षण तिकिट घराजवळून हाकेच्या अंतरावर लोहमार्ग पोलिस ठाणे आहे, मात्र तरीही वादविवाद झाल्यानंतर हाणामारीची घटना, त्यात एकावर जीवघणे हल्ला झालाच कसा? सुरक्षा यंत्रणेचा आभाव असल्याने ही घटना घडली. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा पुन्हा एरणिवर असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरु होती.

Web Title: Two group clash in Reservation ticket house at Dombivli railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.