हाजी मलंग बाबा दर्ग्यावर आरतीवरून दोन गट आमने-सामने; पोलिसांना धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 05:23 PM2021-03-30T17:23:16+5:302021-03-30T17:25:16+5:30

Crime News : याप्रकरणी दोन्ही गटावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून ४ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Two groups face-to-face fighting due to Aarti at Haji Malang Baba Dargah; Police assaulted | हाजी मलंग बाबा दर्ग्यावर आरतीवरून दोन गट आमने-सामने; पोलिसांना धक्काबुक्की

हाजी मलंग बाबा दर्ग्यावर आरतीवरून दोन गट आमने-सामने; पोलिसांना धक्काबुक्की

googlenewsNext
ठळक मुद्देयाप्रकरणी सरकारी नियमात अडथळा व कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा मुन्ना शेख यांच्यासह २० ते २५ जनावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

सदानंद नाईक 


उल्हासनगर : हाजी मलंग बाबा दर्ग्यावर विश्वहिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते रविवारी रात्री साडे सात वाजता आरती करतेवेळी दोन गट आमने-सामने आले. यावेळी दुसऱ्या गटाकडून नारेबाजी होऊन मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की झाली. याप्रकरणी दोन्ही गटावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून ४ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

उल्हासनगर हिललाईन पोलीस रहाण्याच्या हद्दीतील हाजी मलंग बाबा पहाड दर्ग्यावर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे राजेश गायकर, अजय भंडारी, अरुण साळवे, रमेश पाटील, गणेश फुलोरे यांच्यासह १५ ते २० जण विना परवाना व कोरोना नियमाचे उल्लंघन करून रविवारी रात्री साडे सात वाजता आरती करीत होते. त्यावेळी पहाडी परिसरात राहणारे मुना शेख, झाकीर शेख, मोहम्मद अली, गुरू शेख, हुसेन अन्सारी, तौकीक मुनिर शेख, सरफारोज शेख यांच्यासह २० ते २५ जणांनी आरतीच्या ठिकाणी रात्री ८ वाजता धाव घेतली. त्यांनी आरती करणाऱ्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्या समोर येऊन अल्ला व अकबर नावाची नारेबाजी करून त्यांच्या अंगावर धावून गेले. मात्र तैनात असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केल्याने, पुढील अनर्थ टळला. दरम्यान मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार एका गटाकडून झाला. याप्रकरणी सरकारी नियमात अडथळा व कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा मुन्ना शेख यांच्यासह २० ते २५ जनावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

हिललाईन पोलिसांनी विना परवाना व कोरोना नियमाचे उल्लंघन करून हाजी मलंग बाबा पहाडी दर्ग्यावर आरती करणाऱ्या दुसऱ्या गटातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या राजेश गायकर यांच्यासह १५ ते २० जनावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अनेकांना नोटिसा पाठविल्या असून आतापर्यंत ४ जनावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलीस करीत असून अन्य जणांना अटक करण्याचे संकेत दिले. तसेच हाजी मलंग बाबा पहाडी दर्ग्यावर पोलीस बंदोबस्त वाढविल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Two groups face-to-face fighting due to Aarti at Haji Malang Baba Dargah; Police assaulted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.