गर्लफ्रेंडच्या वादातून दोन गटात हाणामारी, हिललाईन पोलीस ठाण्यासमोर राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 06:49 PM2022-04-19T18:49:06+5:302022-04-19T18:49:41+5:30
Fighting in front of police station : उल्हासनगरात राहणाऱ्या भानू नावाच्या मुलावर एका मुलीचे प्रेम होते.
सदानंद नाईक
उल्हासनगर : गर्लफ्रेंडच्या वादातून तरुणाच्या दोन गटात शनिवारी रात्री राडा होऊन तीन जण गंभीर जखमी झाले. हाणामारीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली असून हिललाईन पोलिसांनी दोन्ही ग्रुपच्या सदस्यांवर गुन्हे दाखल केले आहे.
उल्हासनगरात राहणाऱ्या भानू नावाच्या मुलावर एका मुलीचे प्रेम होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले. दरम्यान मुलीचे मुल्ला नावाच्या मुला सोबत सूत जुळले. याची माहिती भानू नावाच्या मुलाला मिळाल्यावर त्याला याचा राग आला. शनिवारी नेताजी चौकात भानू व मुल्ला यांचे दोन्ही गट आमने-सामने आल्यावर त्यांच्यात तू तू मैं मैं झाली. बोलाचालीचे रूपांतर हाणामारीत झाल्यावर तिघेजण गंभीर जखमी झाले. दोन तरुणाच्या गटात ऐन हिललाईन पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर राडा झाल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे. या राड्यात तीन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे. हिललाईन पोलिसांनी दोन्ही गटातील तरुणावर गुन्हे दाखल केल्याची माहिती वारिष्ट पोलीस निरीक्षक सारिपुत्र यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.