Breaking : दोन बंदूकधारी हॉटेल ताजमध्ये घुसणार; असा कॉल आल्याने उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 18:40 IST2021-06-26T16:47:32+5:302021-06-26T18:40:35+5:30
Bomb Scare : बीडीडीएसच्या तीन गाड्या घटनास्थळ रवाना झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Breaking : दोन बंदूकधारी हॉटेल ताजमध्ये घुसणार; असा कॉल आल्याने उडाली खळबळ
मुंबई - २१ जूनला मंत्रालयात बॉम्ब ठेवणार असल्याचा इमेल प्राप्त झाल्यानंतर आता कुलाबा परिसरात पर्यटकांना आकर्षून घेणाऱ्या हॉटेल ताजला देखील धमकीचा कॉल प्राप्त झाला आहे. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. कुलाबा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक बॉम्ब नाशक आणि शोधक पथक ( बीडीडीएस) हॉटेल ताज परिसरात पोहचले असून सर्च ऑपरेश सुरु आहे. बीडीडीएसच्या तीन गाड्या घटनास्थळ रवाना झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अज्ञाताने दोन बंदूकधारी हॉटेल ताजमध्ये घुसल्याच्या कॉल ताजला केला होता, मात्र तो फेक कॉल असल्याचे कुलाबा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुसुम वाघमारे यांनी सांगितले.
२६/११ मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात देखील हॉटेल ताजला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. त्यामुळे आलेल्या कॉलची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांचे पथक सर्च ऑपरेशन करत आहे. तसेच हॉटेलच्या आत हॉटेल ताजची खाजगी सुरक्षा देखील असल्याने ती यंत्रणा देखील कामाला लागली आहे. हॉटेल ताजला हॉटेलात दोन बंदूकधारी घुसणार असा निनावी कॉल कोणी केला, याचा वेगवान तपास कुलाबा पोलिसांनी केला असता, हा कॉल एका नववीतील १४ वर्षीय मुलाने मोबाईलवरून केला असल्याचे उघडकीस आले आहे. हा मुलगा कराडचा असून त्याच्या आई वडिलांची पोलीस चौकशी करत आहेत.
मंत्रालयात बॉम्ब ठेवणार असल्याची धमकी देणारा ई मेल प्राप्त झाल्याने मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महत्वाचे म्हणजे मे महिन्यात देखील मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली होती. मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल पुण्यातून आला होता. याठिकाणी शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मुलाला शाळेत एडमिशन मिळाले नाही म्हणून गृहविभागाला धमकीचा ईमेल केला. शैलेश हा घोरपडी येथील राहणारा आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.