घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 05:24 PM2023-12-11T17:24:42+5:302023-12-11T17:25:50+5:30
मंगेश कराळे नालासोपारा :- घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश मिळाले आहे. दोन्ही आरोपीकडून ...
मंगेश कराळे
नालासोपारा :- घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश मिळाले आहे. दोन्ही आरोपीकडून २ लाख ४१ हजार ६८५ रुपये किंमतीचे रोख रक्कम, चांदीचे दागिने हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे.
वसईच्या के टी एम्पायर येथे केटी बिल्डर्सचे कार्यालय आहे. या कार्यालयात २१ नोव्हेंबरला रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दोन चोरट्यांनी बंद कार्यालयाच्या मागील गेट तोडून कार्यालयात प्रवेश करत रोख रक्कम, चांदीचे दोन शिक्के, पाच चांदीचे पेले असा ४ लाख ५५ हजाराचा मुद्दैमाल चोरून नेला होता. या चोरी प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. माणिकपुर पोलीस ठाणे हद्दीमध्ये वारंवार घरफोडीसारखे गुन्हे होत असल्याने पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन माणिकपुरच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास आरोपींचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या.
त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने वसई, विरार तसेच अंधेरी, मुंबई परिसरातील जवळपास १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींचा मागोवा घेतला असता सदरचे आरोपी हे अंधेरी रेल्वे स्टेशन परिसरात फिरस्ते असल्याची माहिती प्राप्त झाली. अंधेरी येथुन सापळा रचुन आरोपी राहुल ऊर्फ अमर सुरेंदर सिंग (३५) आणि करण ओमप्रकाश खैरवाल (२४) यांना शिताफीने अटक करुन त्यांचेकडुन २ लाख ४१ हजार ६८५ रुपये किंमतीचे रोख रक्कम, चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले/श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बड़े, वरिष्ट पोलीस निरीक्षक राजू माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिलिंद साबळे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) ऋषिकेश पवळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार शैलेश पाटिल, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, गोविंद लवटे, आनंदा महादेव, प्रषिण कांदे, पुजा कांबळे यांनी केली आहे.