कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागून स्वीकारणारे विमा निगमचे दोघे एसीबीच्या जाळ्यात

By अजित मांडके | Published: April 6, 2024 03:31 PM2024-04-06T15:31:28+5:302024-04-06T15:31:51+5:30

ही कारवाई ५ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आल्याची माहिती ठाणे एसीबीने दिली.

Two insurance companies who accepted a bribe of Rs 50,000 for not taking action are in ACB's net | कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागून स्वीकारणारे विमा निगमचे दोघे एसीबीच्या जाळ्यात

कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागून स्वीकारणारे विमा निगमचे दोघे एसीबीच्या जाळ्यात

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: दंड आणि कारवाई न करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या ठाण्यातील राज्य विमा निगम कार्यालयाच्या सहायक निदेशक अधिकारी धीरेद्र सतेंद्र मिश्रा आणि सामाजिक सुरक्षा अधिकारी रवीकुमार तुकाराम तेलवडे या दोघांविरोधात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल करत अटक केली. ही कारवाई ५ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आल्याची माहिती ठाणे एसीबीने दिली.

तक्रारदारांचा कार वॉशिंग यांचा व्यवसाय असून तो सध्या बंद असल्याने त्यांनी त्याबाबत राज्य विमा निगमच्या ठाणे कार्यालयाला कळवले नव्हते. तसेच वेळोवेळी त्यांनी कर्मचाऱ्यांचा विमा न भरल्याने शासनाचे नुकसान केल्याने राज्य विमा निगम ठाणे कार्यालयाकडुन दंड व व्याज अशी ७ लाख ६९ हजार १०४ रुपयांचा दंड आकारून, नोटीस बजावली. हा दंड व कारवाई न करण्यासाठी रवीकुमार यांनी तक्रारदारांकडे ०५ एप्रिल रोजी २०२४ रोजी दोन लाख रूपये लाचेची मागणी केली. याचदरम्यान तडजोडीअंती पहिले ५० हजार व दहा दिवसानंतर राहिलेले ५० हजार असे एकुण १ लाख रूपयाची मागणी केली. त्यावेळी तक्रारदारांनी ठाणे एसीबी कार्यालयात धाव घेऊन तक्रार दिली. तसेच त्यापैकी ५० हजार रूपयाचा पहिला लाचेचा हप्ता स्वतःसाठी व वरीष्ठ अधिकाऱ्यांसाठी रवीकुमार यांनी तक्रारदारांकडून स्विकारला.

त्याबाबत त्यांनी वरीष्ठ अधिकारी धीरेन्द्रकुमार यांना फोनवरून लाचेची रक्कम ५० हजार रूपये स्विकारल्याबाबत सांगितले. त्यावेळी, धीरेद्रकुमार यांनी एक लाख तक खिच असे बोलून स्विकारलेली लाचेची रक्कम त्यांच्या वागळे इस्टेट येथील कार्यालयात घेऊन रवीकुमार याला बोलावले. अशाप्रकारे लाचेच्या रकमेमध्ये वरिष्ठ अधीकारी धीरेद्रकुमार यांनी देखील सहभाग दर्शवुन प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाल्यावर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्या दोघांना अटक केल्याचे एसीबीने सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष अंबिके करत आहेत.

Web Title: Two insurance companies who accepted a bribe of Rs 50,000 for not taking action are in ACB's net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.