गुगल पे क्यूआर काेड बदलून दोन तरुणींनी डाॅक्टरला घातला गंडा, ४ लाखाहून अधिक रक्कम उडवली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 08:56 AM2022-04-11T08:56:51+5:302022-04-11T08:57:08+5:30
डॉक्टरांकडे कामाला असलेल्या दोन तरुणींनी गुगल पे क्यूआर कोड बदलून थेट आपल्या बँक खात्यात पैसे जमवून तब्बल ४ लाख १२ हजार १७२ रुपयांना गंडा
रत्नागिरी :
डॉक्टरांकडे कामाला असलेल्या दोन तरुणींनी गुगल पे क्यूआर कोड बदलून थेट आपल्या बँक खात्यात पैसे जमवून तब्बल ४ लाख १२ हजार १७२ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार बँक स्टेटमेंट काढल्यानंतर उघडकीस आला. फसवणूक करणाऱ्या दाेघींना पाेलिसांनी अटक केली आहे.
डाॅ. अविनाश भागवत (४८) यांच्या पेट शाॅपमध्ये रेणुका बबन गिजे (२६) व दिशा दिनेश सुर्वे (२८) या दाेघी कामाला हाेत्या. ऑनलाइन व्यवहारासाठी डाॅ. भागवत यांनी गुगल पे क्यूआर काेड काढला हाेता. मात्र, या दाेघींनी हा क्यूआर काेड बदलून स्वत:च्या गुगल पे अकाउंटचा क्यूआर काेड लावला. त्यामुळे या ठिकाणी जमा हाेणारी रक्कम थेट या दाेघींच्या खात्यात जमा हाेत हाेती. एप्रिल २०२१ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत रेणुका गिजे हिच्या खात्यात २,०७,०९३ रुपये, तर दिशा सुर्वे हिच्या बँक खात्यात २,०१,२७९ रुपये जमा झाले.