भयंकर! बहिणीने संपत्तीत हिस्सा मागितल्याने भावांकडून हातोडा, हेल्मेटने बेदम मारहाण; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 02:41 PM2021-07-06T14:41:30+5:302021-07-06T14:50:14+5:30
Crime News : नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बहिणीने संपत्तीत हिस्सा मागितला म्हणून भावांकडून हातोडा आणि हेल्मेटने बेदम मारहाण करण्यात आली आहे.
संपत्तीवरून अनेकदा कुटुंबीयांमध्ये वादविवाद होत असतात. काही वाद हे टोकाला देखील जातात. अशीच एक भयंकर घटना पाकिस्तानच्या पेशावरमध्ये घडली आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बहिणीने संपत्तीत हिस्सा मागितला म्हणून भावांकडून हातोडा आणि हेल्मेटने बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनीअटक केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता हे प्रकरण समोर आलं आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अब्दुल हन्नान या व्यक्तिच्या मुलांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होते. दोन्ही मुले आफताब आणि अर्षद यांनी आपल्या बहिणीला बेदम मारहाण केली. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओनुसार, बहिणीने दरवाजा उघडल्यानंतर दोन्ही भावांनी बहिणीला हातोडा आणि हेल्मेटने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच बहीण पडल्यानंतरही ते दोघे तिला मारहाण करत होते. घरातील एक वृद्ध महिला तिला वाचवण्याचा प्रयत्न करते. मात्र तिलाही धक्काबुक्की करण्यात येते. ही वृद्ध महिला त्यांची आई असल्याचं सांगण्यात येत आहे.
@AbbasAhsan
— طLح رشid (@TALHArashid47) July 3, 2021
I never imagined I will do this. I am uploading this video in position of very helplessness. Today my three maternal uncle attacked my mother when I and my brother were not home. They attacked and badly beat my mother and grandmother#HelpArsalanFamily
Helpthisfamily pic.twitter.com/Bf5C9V67cO
खैबर पख्तुनख्वा पोलिसांनी पेशावरमधील या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडे आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. बहिणीने संपत्तीत वाटा मागितल्याने मारहाण केली असल्याचे आरोपींनी म्हटले आहे.पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मारहाणीची तक्रार दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका तरुणीला तिचे वडील आणि भावाने मिळून झाडाला उलटं लटकलं आणि नंतर बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.
संतापजनक! सोशल मीडियावर व्हिडीओ जोरदार व्हायरल; 4 जणांना अटक#crime#crimenews#Policehttps://t.co/SeuWvPTT5I
— Lokmat (@MiLOKMAT) July 3, 2021
नात्याला काळीमा! वडील आणि भावाने तरुणीला झाडाला उलटं लटकवून बेशुद्ध होईपर्यंत केली बेदम मारहाण
मध्य प्रदेशच्या अलीराजपूरमध्ये ही संतापजनक घटना घडली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 50 किलोमीटर दूर बोरी ठाण्याजवळील एका गावात 28 जून 2021 रोजी ही धक्कादायक घटना घडली. वडिलांनी आणि भावाने मिळून तिला झाडाला उलटं लटकवलं आणि बेदम मारहाण केली. तसेच जमिनीवर आपटून देखील तिला मारहाण करण्यात आली. ती बेशुद्ध होईपर्यंत तिला मारहाण करण्यात येत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
बापरे! पती-पत्नीत दुरावा आला अन् सासऱ्यासोबत जवळीक वाढली मग झालं असं काही...#Crime#Policehttps://t.co/Bhu1Vug7Hu
— Lokmat (@MiLOKMAT) July 6, 2021