वेश्या व्यवसायावर कारवाई करुन १२ वर्षाच्या मुलीसह २ अल्पवयीन मुलींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 07:27 PM2021-12-10T19:27:24+5:302021-12-10T19:29:08+5:30
Prostitution Case : गुरुवारी पाटील यांनी बोगस गिर्हाईक व पंच यांना साईबाबा नगर येथे पाठवून खात्री करून घेतली. दलाल महिलेने २ अल्पवयीन मुली तर ३ तरुणी वेश्याव्यवसायासाठी आणल्या होत्या.
मीरारोड - मीरारोड येथील एका महिला वेश्या दलालावर कारवाई करून तिच्या तावडीतील १२ वर्षाच्या मुलीसह एकूण २ अल्पवयीन मुलींची व ३ तरुणींची सुटका अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांना माहिती मिळाली कि, मीरारोड येथे राहणारी महिला वेश्यादलाल वेश्यागमना करीता मुली पुरवित आहे. गुरुवारी पाटील यांनी बोगस गिर्हाईक व पंच यांना साईबाबा नगर येथे पाठवून खात्री करून घेतली. दलाल महिलेने २ अल्पवयीन मुली तर ३ तरुणी वेश्याव्यवसायासाठी आणल्या होत्या. त्यातील एका १२ वर्षाच्या मुलीचे कौमार्य भंग करण्याची बोली लावून त्याची रक्कम तिने बोगस गिऱ्हाइकाकडून स्वीकारली.
त्या नंतर पाटील यांनी सहाय्यक निरीक्षक तेजश्री शिंदे सह उमेश पाटील, विजय निलंगे, वैष्णवी यंबर, केशव शिंदे, सुप्रिया तिवले, गावडे यांच्या पथकाने छापा मारला. अल्पवयीन मुलींचा मानसिक व शारीरिक छळ महिला वेश्या दलालने चालवला होता . मीरारोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोक्सो सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा, भा.द.वि.सं. खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे .