दाेन अल्पवयीन मुली गायब; अज्ञातावर गुन्हा दाखल

By राजकुमार जोंधळे | Published: May 17, 2023 11:54 PM2023-05-17T23:54:20+5:302023-05-17T23:54:28+5:30

दाेन्ही घटना एकाच दिवशी घडल्या

Two minor girls missing; A case has been registered against an unknown person | दाेन अल्पवयीन मुली गायब; अज्ञातावर गुन्हा दाखल

दाेन अल्पवयीन मुली गायब; अज्ञातावर गुन्हा दाखल

googlenewsNext

राजकुमार जाेंधळे, शिरूर अनंतपाळ (जि. लातूर): तालुक्यातील साकोळ आणि शिवपूर परिसरातील दाेन अल्पवयीन मुली गायब झाल्या आहेत. त्यांना काेणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या दाेन्ही घटना एकाच दिवशी घडल्या आहेत. याबाबत शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी अज्ञाताविराेधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ आणि शिवपूर परिसरात राहणाऱ्या १५ ते १६ वयाेगटांतील दाेन अल्पवयीन मुली एकाच दिवशी गायब झाल्या. त्यांचा नातेवाइकांनी, कुटुंबीयांनी सर्वत्र शाेध घेतला, मात्र त्या आढळून आल्या नाहीत. त्यांना काेणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत शिरूर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविराेधात अपहरणाचे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलिस हेड काॅन्स्टेबल दयानंद वासुदेव, सचिन चामे करीत आहेत.

Web Title: Two minor girls missing; A case has been registered against an unknown person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.