जिल्हा कारागृहातील शौचालयात व दरवाजाच्या फटीत ठेवलेले दोन मोबाईल जप्त, कैद्यावर गुन्हा दाखल
By रूपेश हेळवे | Published: November 18, 2022 05:20 PM2022-11-18T17:20:49+5:302022-11-18T17:21:34+5:30
बर महिन्यात दक्षता पथकाने जिल्हा कारागृहात भेट दिली.
सोलापूर : जिल्हा कारागृहातील न वापरण्यात येत असलेल्या शौचालयात व दरवाज्याच्या फटीत लपवून ठेवलेले दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे. याबाबत बंदी दिलीप तायप्पा जगले याच्यावर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा गुरूवारी रात्री दाखल झाला आहे.
सप्टेंबर महिन्यात दक्षता पथकाने जिल्हा कारागृहात भेट दिली. त्या भेटी दरम्यान बॅरेक क्र. १ च्या शौचालयात दाराच्या आतील बाजूस सिमेंटचे कच्चे काम केल्याचे आढळले. त्यात पहाणी केल्यानंतर तेथे एक मोबाईल व एक बॅटरी असे साहित्य सापडले. शिवाय कारागृहाच्या हॉस्पिटल विभागाच्या वापरत नसलेल्या शौचालयात काळ्या रंगाचा एक मोबाईल व चिकटपट्टीमध्ये गुंडाळून ठेवलेले चार्जर असे एकूण दोन मोबाईल, चार्जर व एक बॅटरी पोलीसांनी जप्त केले.
दरम्यान, मोबाईल मधील माहितीच्या आधारे आरोपी जगले या कैद्याने वापरल्याच्या संशयावरून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २२ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने याबाबतचा गुन्हा गुरूवारी दाखल करण्यात आला.