मोबाइल चोरीतील आणखी दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 02:12 AM2019-11-28T02:12:36+5:302019-11-28T02:13:09+5:30
पनवेल शहर पोलिसांनी पाच लाख रुपयांचे मोबाइल चोरणाऱ्या आणखी दोघांना अटक केली आहे.
पनवेल : शहर पोलिसांनी पाच लाख रुपयांचे मोबाइल चोरणाऱ्या आणखी दोघांना अटक केली आहे. यापूर्वी या गुन्ह्यातील चार आरोपींना अटक केली होती. या दोघांकडून ६० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
शहरातील किंग्ज इलेक्ट्रोनिक्स या दुकानात २ नोव्हेंबर रोजी चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून महागडे मोबाइल चोरी केले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे आणि पथकाने या प्रकरणी भीम कमान बिस्टा (२५, कामोठे), बिरका केरसिंग बिस्टा (३२, नवीन पनवेल), चकरा उर्फ चरण बहादूर रतन शाही (२५, पुणे), रमेश भवन रावल (३०, कल्याण) या चार जणांच्या टोळीला अटक केली होती.
नेपाळी आरोपींच्या चौकशीमध्ये आणखी दोन आरोपी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जनक तुलाराम जोशी (वय २३) आणि जनक अमर खत्री (वय २१) यांना अटक केली असून, त्यांच्याकडून ६० हजाराची रक्कम जप्त के ली आहे.