बँक एटीएम डेटा चोरी करणारे दोन नायजेरियन अटकेत;समतानगर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 12:50 PM2019-05-14T12:50:47+5:302019-05-14T12:51:24+5:30
बँक एटीएममध्ये स्कीमर बसवुन डेटा चोरीचा आरोप
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - बँकेच्या एटीएममध्ये स्कीमर बसवुन ग्राहकांची माहिती चोरणाऱ्या दोन नायजेरियन यांना सोमवारी अटक करण्यात आली. यात एका महिलेचा देखील समावेश असुन समतानगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
इसाईआह ओगुणलेये सेयी (३४) आणि त्याची साथीदार कोलीन मवागी वरीरी (३७) यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. हे दोघे नालासोपारा परिसरात प्रिन्स अपार्टमेंटमध्ये राहतात. कांदिवली पुर्वच्या ठाकूर व्हीलेज परिसरात असलेल्या एस बँकेच्या एटीएममध्ये त्यांनी स्कीमर मशीन आणि कॅमेरा बसवला होता. त्यातून ग्राहकांचा डेटा चोरुन त्यामार्फत डेबिट आणि क्रेडीट कार्ड तयार करुन ते खरेदी करायचे. याबाबत समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर परिमंडळ १२ चे पोलीस आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड आणि समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आंधळे आणि पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून स्कीमर तसेच अन्य साधन सामग्री हस्तगत करण्यात आली असुन न्यायालयाने त्यांना १७ मे, २०१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.