एम. डी. कॉलेजमधील दोन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 07:38 PM2018-10-15T19:38:58+5:302018-10-15T19:39:19+5:30
रजिस्ट्रार अजय शांताराम राणे (वय ४३) आणि सहाय्य्क लेखापाल सुधीर भालेराव (वय ४५) यांना रंगेहाथ अटक केली आहे. आज दुपारी १२. ४५ वाजताच्या सुमारास ही एसीबीने कारवाई केली आहे. अटक केलेल्या दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मुंबई - परळ येथील एम. डी. कॉलेजमध्ये सुट्टीचे पैसे मंजूर करण्यासाठी एका ६० वर्षीय इसमाकडे एम. डी. कॉलेजमधील रजिस्ट्रार आणि सहाय्य्क लेखापाल यांनी त्यांच्याकडे लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तक्रारदार ६० वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे (एसीबी) याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एसीबीने सापळा रचून एम. डी. कॉलेजमधून १२ हजारांची लाच घेताना रजिस्ट्रार अजय शांताराम राणे (वय ४३) आणि सहाय्य्क लेखापाल सुधीर भालेराव (वय ४५) यांना रंगेहाथ अटक केली आहे. आज दुपारी १२. ४५ वाजताच्या सुमारास ही एसीबीने कारवाई केली आहे. अटक केलेल्या दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.