एमटीएनएल आगप्रकरणी दोन अधिकारी निलंबित; वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 05:57 PM2019-08-07T17:57:59+5:302019-08-07T18:01:29+5:30
याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई - २२ जुलै रोजी वांद्रे येथील एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीप्रकरणीएमटीएनएलचे वरिष्ठ व्यवस्थापक एस. डी. पंडितराव आणि उपव्यवस्थापक आर. बी. यादव निलंबित यांना करण्यात आलं आहे. तर याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२२ जुलैला वांद्रे पश्चिमेकडील एस व्ही रोडवरील एमटीएनएल इमारतीला आग लागली होती. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली आणि अडकलेल्या ८० हून अधिक लोकांना बाहेर काढले होते. याप्रकरणी काही प्रत्यक्षदर्शींनी जबाब नोंदविला असून एमटीएनएलच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना या आगीप्रकरणी दोषी ठरवून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर वांद्रे पोलीस ठाण्यात मुंबई अग्निशमन दलाने एमटीएनएलविरोधात बेजबाबदारपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई - वांद्रे येथील एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीप्रकरणी वरिष्ठ व्यवस्थापक एस. डी. पंडितराव आणि उपव्यवस्थापक आर. बी. यादव निलंबित https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) August 7, 2019