नगरसेवक राहुल कांडगेसह दोन जणांना बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 06:57 PM2019-05-17T18:57:36+5:302019-05-17T18:58:23+5:30
बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे चाकण येथील नगरसेवक राहुल कांडगे सह दोघांना अटक केली आहे.
चाकण : बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे चाकण येथील नगरसेवक राहुल कांडगे सह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, मॅगझीन, दोन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल, एक फॉर्च्यूनर असा एकूण २० लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल किसन कांडगे ( वय ३६, रा. भारत चौक, मार्केटयार्ड जवळ, चाकण ) व अश्पाक महंमद शेख ( वय ३४, रा.चाकण ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत .
पोलिसांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, मनमाड- नगर रोड वरून नगरच्या दिशेने जाणाऱ्या एक पांढऱ्या रंगाच्या गाडीमधील व्यक्तीकडे गावठी कट्टा आहे. त्यानंतर पोलिसांनी निबळक बायपास चौकात सापळा रचून गाडी थांबवली. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता देशी बनावटीचे पिस्तूल, गावठी कट्टा मॅगझिन आढळून आले. पोलिसांनी फॉर्च्युनरकारसह अग्नि शस्त्रे जप्त केली आहेत. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुल किसन कांडगे हा चाकण येथील नगरसेवक असून त्याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात पाच गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
-----------------