मोटरसायकलला ट्रकने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू तर एक मुलगी बचावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 23:11 IST2021-03-11T23:10:54+5:302021-03-11T23:11:44+5:30
Accident : पुलगाव जवळ असलेल्या इनाया येथे राहणाऱ्या महाजन परिवारातील प्रमिला महाजन वय 65 महेंद्र महाजन वय 35 व रसिका गजानन देवळे वय 15 ह्या बोरगाव हातला येथील एका महाराजांची मृत्यू

मोटरसायकलला ट्रकने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू तर एक मुलगी बचावली
आर्वी (वर्धा): पुलगाव कडून बोरगाव हातला येथे मयत मध्ये सामील होण्याकरिता येत असताना पिपरी पारगोठण फाट्याजवळ ट्रकने मागून धडक दिल्याने मोटर सायकल चालकासह महिलाचा जागीच मृत्यू झाला असून एका 15 वर्षीय मुली चा जीव थोडक्यात बचावला ही घटना आज साडेतीन ते चार वाजता चे दरम्यान पिंपरी पारगोठान फाट्याजवळ घडली.
पुलगावजवळ असलेल्या इनाया येथे राहणाऱ्या महाजन परिवारातील प्रमिला महाजन वय 65 महेंद्र महाजन वय 35 व रसिका गजानन देवळे वय 15 ह्या बोरगाव हातला येथील एका महाराजांची मृत्यू झाल्याने त्यांच्या अंत्ययात्रेत सामील होण्याकरिता बोरगाव हातला येथे अंत्ययात्रेत सामील होण्याकरिता येत असताना पिंपरी पारगोठान फाट्याजवळ मागून येणाऱ्या ट्रकने मोटरसायकलच्या मागून धडक दिल्याने मोटर सायकल चालक महेंद्र महाजन व त्यांची आई प्रमिला महाजन यांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून त्याच गाडीवर येत असलेली रसिका गजानन देवडे ही काही प्रमाणात जखमी झाली असून ती ह्या दुर्घटनेतून बालबाल बजावल्याचे पोलीस सूत्रानुसार सांगण्यात येते सध्यास्थितीत मृतकाना आर्वी येथील उप जिल्हा रुग रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमी मुलीवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येते अज्ञात वाहन चालक आपल्या वाहनासह घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येते