६९ किलो गांज्यासह दुकली अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 21:43 IST2019-06-29T21:39:43+5:302019-06-29T21:43:51+5:30
पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून या आरोपीना ताब्यात घेतले.

६९ किलो गांज्यासह दुकली अटकेत
मुंबई - मुलुंड पोलिसांनी तब्बल ६९ किलो एवढ्या गांजासह दोन आरोपींना अटक केली आहे. मनोज बेनूदर साहू आणि रविंद्र निरंजन बरीक अशी या आरोपींची नावे आहेत. गुरुवारी मुलुंड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीत असलेल्या विभागात दोन इसम हे हे गांजा विक्री करण्यास येत असल्याची माहिती मिळाली होती.
पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून या आरोपीना ताब्यात घेतले. पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली असता यातील एका आरोपीने पोलिसांना कोपरी येथे त्याने आणखी गांजा लपवून ठेवल्याची माहिती दिली. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता पोलिसांना त्या ठिकाणी तब्बल ५६ किलो ५०० ग्रॅम एवढा गांजा आढळून आला. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ६९ किलो गांजा या आरोपींकडून हस्तगत केला आहे. या गांजाची अंदाजे किंमत ६ लाख ९० हजार इतकी आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींची पोलीस कसून तपास करीत असून त्यांना एवढा गांजा कुठून मिळाला? तो त्यांनी मुलुंडमध्ये कोणास विकण्यास आणला होता? याचा पोलीस कसून तपास करत आहेत.