'ओव्हरटेक' करू दिलं नाही म्हणून पोलिसांनी काय केलं बघा; एक्स्प्रेस-वे वरचा धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 01:23 PM2020-06-18T13:23:30+5:302020-06-18T13:47:46+5:30

साध्या वेशातील पोलिसांनी ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न वाजवले, मात्र त्यांना साईड न तरुणांनी साईड दिली नाही..

Two police suspended for beating youths due to no gave side overtake | 'ओव्हरटेक' करू दिलं नाही म्हणून पोलिसांनी काय केलं बघा; एक्स्प्रेस-वे वरचा धक्कादायक प्रकार

'ओव्हरटेक' करू दिलं नाही म्हणून पोलिसांनी काय केलं बघा; एक्स्प्रेस-वे वरचा धक्कादायक प्रकार

googlenewsNext
ठळक मुद्देदुचाकीवरून जाणार्‍या तरुणांना मारहाण करणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित 

लोणावळा : मुंबई- पुणे महामार्गावर खाजगी चारचाकी वाहनांमधून आलेल्या दोन साध्या वेशातील पोलिसांनी दुचाकी गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न वाजवले, मात्र त्यांना साईड न दिल्याच्या कारणावरून सदरचे तरुण व साध्या वेशात असलेले पोलीस कर्मचारी यांच्यात शिवीगाळ व धक्काबुक्की झाली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दुचाकीवरून जाणार्‍या तरुणांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचार्‍यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी रात्री गवळीवाडा येथे ही घटना घडली.
    लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील जयराज देवकर व माणिक अहिनवे अशी या निलंबित केलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रफुल्ल बोराडे (वय ३०, रा. ओळकाईवाडी लोणावळा ) यांनी तक्रार दिली होती.
    सोमवारी रात्री दोन दुचाकी गाड्यांवरून चार तरुण लोणावळा बाजारपेठेकडे येत असताना मुंबई- पुणे महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ खाजगी चारचाकी वाहनांमधून आलेल्या दोन साध्या वेशातील पोलिसांनी दुचाकी गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न वाजवले, मात्र त्यांना साईड न दिल्याच्या कारणावरून सदरचे तरुण व साध्या वेशात असलेले पोलीस कर्मचारी यांच्यात शिविगाळ व धक्काबुक्की झाली. याचा विपर्यास भांडणात झाल्याने दोन्ही गटाकडून एकमेकाला मारहाण करण्यात आली. यात पोलीसांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाला फार मार लागला असून एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला आहे. 


     मावळचे आमदार सुनिल शेळके व लोणावळ्यातील राजकीय पदाधिकार्‍यांनी याबाबत मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्यात जाऊन गुंडगिरी करणार्‍या पोलीसांवर कारवाई करण्याची मागणी केली. शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी घटनेची माहिती घेऊन पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांना घटनेचा अहवाल पाठविला होता. संपुर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर सदर दोन पोलीस कर्मचार्‍यांचे पोलीस अधिक्षक यांनी निलंबन केले आहे.

Web Title: Two police suspended for beating youths due to no gave side overtake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.