'विलास तोगे'ला साथ देणारे खंडणीविरोधी पथकातील दोन पोलीस कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 08:53 PM2020-06-08T20:53:32+5:302020-06-08T20:55:54+5:30

दुकानदारावर दबाव आणून ५० हजार रुपये दे,नाही तर तुझ्यावर गुन्हा दाखल करून अटक करतो, अशी धमकी दिली.

Two policemen of anti-ransom squad was suspended in the case of supporting 'Vilas Toge' | 'विलास तोगे'ला साथ देणारे खंडणीविरोधी पथकातील दोन पोलीस कर्मचारी निलंबित

'विलास तोगे'ला साथ देणारे खंडणीविरोधी पथकातील दोन पोलीस कर्मचारी निलंबित

googlenewsNext
ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तोगेविरुद्ध लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : वारजे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विलास तोगे प्रकरणी खंडणीविरोधी पथकातील दोन पोलिसांना भोवले असून, बेकायदेशीरपणे दुकानातील डीव्हीआर जप्त केला व तो देण्यासाठी लाच मागण्यास प्रोत्साहित
केल्याप्रकरणी दोघांना निलंबित करण्यात आले आहे. सहायक पोलीस फौजदार प्रसाद मोकाशी, पोलीस नाईक संदीप पोपट साबळे अशी त्यांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी, शहरात लॉकडाऊनच्या काळात तंबाखुजन्य पदार्थ विकण्याचा बंदी आहे. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी असताना अनेक दुकानदार तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करीत असल्याचे आढळून आल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. वारजे येथील एका चहा विक्री करणार्‍या दुकानदाराकडे गुटखा सापडला नसतानाही तू गुटखाविक्री करतो असे सांगून १९ मे रोजी मोकाशी व साबळे यांनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय दुकानावर छापा घातला. तेव्हा दुकानदाराने आपल्या ओळखीच्या हवालदार विलास तोगे यांना बोलविले. त्याच्याबरोबर आणखी एक बाळासाहेब चव्हाण ही व्यक्ती होती. चौघांनी मिळून दुकानदारावर दबाव आणून ५० हजार रुपये दे, नाही तर तुझ्यावर गुन्हा दाखल करून अटक करतो, अशी धमकी दिली. तेव्हा या
दुकानदाराने इतके पैसे नसल्याचे सांगितले. तेव्हा जेवढे असतील तेवढे घेऊन ये, असे सांगितले.  दुकानदाराकडून त्यांनी चव्हाणमार्फत ३८ हजार रुपये घेतले व उरलेले १२ हजार रुपये आणून देण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या
दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा व डीव्हीआर घेतला. तू याबाबत कोणाला काही सांगू नको, नाही तर तुझ्या सर्व धंद्याचे रेकॉर्डिंग यामध्ये आहे. ते आम्ही कोर्टात दाखवू. राहिलेले १२ हजार रुपये घेऊन ये व डीव्हीआर घेऊन जा, अशी धमकी दिली़ त्यानंतर त्यांना ते वारजे पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथे गेल्यावर मोकाशी याने आम्ही तुझ्यावर नॉर्मल केस करतो. त्यानंतर चौघे निघून गेले. एका हवालदाराने त्यांना एक मेमो दिला. उरलेल्या १२ हजार रुपयांसाठी ते फोन करत होते. तेव्हा या दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने
२० मे रोजी त्यांची तक्रार नोंदवून गुन्ह्याची पडताळणी केली. कडून त्यात विलास तोगे याने १२ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तोगेविरुद्ध लाचेची मागणी केल्याचा गुन्हा
वारजे पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री दाखल केला.
याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यावर वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या गुन्ह्यात डीव्हीआर जप्त करण्याची आवश्यकता नसताना तो जप्त केला. तसेच वारजे पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली दाखल असलेल्या गुन्ह्यास कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने मोकाशी आणि साबळे यांना निलंबित करण्यात आले.
.......

या प्रकरणातील विलास तोगे हा पूर्वी कोंढवा पोलीस ठाण्यात ६ वर्षे कार्यरत होता. त्या काळात त्याचा तेथे दरारा होत. पोलीस ठाण्यात येणार्‍या प्रत्येक वरिष्ठ अधिकार्‍यांशी त्याचे मधुर संबंध असायचे. त्यामुळे हवालदार असूनही पोलीस अधिकारी त्याला वचकून असत. वारजेतही त्याची अशीच इमेज होती.

Web Title: Two policemen of anti-ransom squad was suspended in the case of supporting 'Vilas Toge'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.