कुत्र्याची दोन पिल्ले ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडली; संतप्त नागरिकांना दोघांना चोपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 22:13 IST2021-09-22T22:13:34+5:302021-09-22T22:13:56+5:30
Crime News : ही घटना फलटण तालुक्यातील तावडी येथे २१ रोजी घडली.

कुत्र्याची दोन पिल्ले ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडली; संतप्त नागरिकांना दोघांना चोपले
सातारा : ट्रॅक्टरच्या पाठीमागील चाकाखाली कुत्र्याची दोन पिल्ले चिरडल्याने संतप्त होऊन तिघांनी ट्रॅक्टर चालकासह चार ते पाचजणांना मारहाण केली. ही घटना फलटण तालुक्यातील तावडी येथे २१ रोजी घडली.
कुत्र्याची दोन लहान पिल्ले ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून ठार झाल्यानंतर आप्पा मदने आणि गणेश मदने, ऋषिकेश मदने (सर्व रा. कैकाडी मळा, तावडी, ता. फलटण) हे तिघे संतप्त झाले. संकेत निंबाळकर (वय २७, रा. तावडी, ता. फलटण) याला व त्याच्या चुलत भाऊ प्रतिक निंबाळकरला त्यांनी मारहाण केली. लोखंडी मेक व नटबोल्ट खोलण्याचा पान्याने त्यांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.