दरोडा टाकण्यापूर्वी दोन दरोडेखोरांना अटक; ३ जण फरार, मुंबईतील बोरवली येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2022 06:16 PM2022-10-26T18:16:59+5:302022-10-26T18:20:01+5:30
दिवाळीनिमित्त पोलिसांची ड्युटी वाढते. कोणतीही घटना घडू नये यासाठी पोलिसांची गस्त वाढवली जाते.
मुंबई- मुंबई उपनगर बोरिवली येथील एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या चव्हाण-काळे टोळीतील दोन दरोडेखोरांना दरोडा टाकण्यापूर्वी कस्तुरबा पोलिसांनी अटक केली असून तिघे अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. चोरट्यांचा चोरीचा उद्देश सफल झाला नाही त्यामुळे त्यांच्याकडे काही मालमत्ता आम्हाला मिळालेली नाही.
दिवाळीनिमित्त पोलिसांची ड्युटी वाढते. कोणतीही घटना घडू नये यासाठी पोलिसांची गस्त वाढवली जाते. बँकेचे एटीएम लुटण्यासाठी बीट मार्शल येत असल्याची खबर मिळताच वाळुंजकर यांनी वरिष्ठांना कळवले व त्यांच्या आदेशानुसार त्यांनी पोलीस पथकासह सापळा रचला. दुपारी 3.15 वाजता 5 जण बँकेत आले आणि एटीएम जवळ थांबले. पोलिसांचा संशय आल्याने ते सर्वजण पळू लागले. पोलिसांनी 2 जणांना पकडले. उर्वरित 3 जण पळून जाण्यात यशस्वी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले दरोडेखोर हे चोरटे आहेत. ते चव्हाण काळे टोळीचे सदस्य आहेत. करण चव्हाण आणि प्रकाश अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे अन्य साथीदार गोपी चव्हाण, गोविंद काळे, आणि राहुल काळे हे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. फरार आरोपींचा शोध घेत आहोत.