लूटमार करणाऱ्या दोघांना ठाण्यात अटक; तलवारही हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 05:47 AM2022-03-07T05:47:31+5:302022-03-07T05:47:39+5:30
चितळसर पोलिसांची कारवाई, ठाण्यातील रायकरवाडीमध्ये राहणारे दीपक साव हे आपले मित्र विजयकुमार यादव यांच्यासह ४ मार्च रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी जाण्यासाठी कापूरबावडीतील बसस्टॉप येथे जात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : तलवारीचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या गणेश प्रभाकर धिवर (२२, माजीवाडा गाव, ठाणे) आणि विक्की ओझा (२०, रा. वर्तकनगर, ठाणे) या दोघांना चितळसर पोलिसांनी शनिवारी अटक केली. जबरी चोरीसाठी त्यांनी वापरलेली तलवारही त्यांच्याकडून हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
ठाण्यातील रायकरवाडीमध्ये राहणारे दीपक साव हे आपले मित्र विजयकुमार यादव यांच्यासह ४ मार्च रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी जाण्यासाठी कापूरबावडीतील बसस्टॉप येथे जात होते. ते घोडबंदर रोडवर आले असता, विनाक्रमांकाच्या एका स्कूटरवरून आलेल्या गणेश आणि विक्की या दोघांनी तलवारीच्या धाक दाखवून दीपक यांच्या पॅन्टच्या खिशातील चारशे रुपयांची रक्कम जबरदस्तीने चोरली. याप्रकरणी दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पथकाने प्रभाकर आणि विक्की या दोघांनाही पाठलाग करून काही तासांमध्ये अटक केली.
याआधीही केली लूटमार
nगणेश आणि विक्की या दोघांनी एक आठवड्यापूर्वीही घोडबंदर रोड भागात एका टँकरचालकाला पाणी मागण्याच्या बहाण्याने मोटारसायकल आडवी लावून त्याच्याकडून १८ हजारांची रक्कम जबरीने चोरली होती.
nयाप्रकरणीही चितळसर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास सुरु हाेता.
nया टोळीकडून जबरी चोरीचे आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.