बोल बच्चन टोळीच्या दोन भामट्यांनी पैसे, साडीचे आमिष दाखवून वृद्धेस लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 08:56 PM2021-06-21T20:56:14+5:302021-06-21T21:07:01+5:30
Crime News : दवाखाना कुठे म्हणून दोन अनोळखी व्यक्तींनी शिंदेंकडे विचारणा करत बोलण्यात गुंतवले.
मीरा रोड - एका ६८ वर्षीय वृद्ध महिलेस बोल बच्चन टोळीच्या दोन भामट्यांनी पैसे व साडी चे आमिष दाखवून सोन्याच्या चार तोळ्याच्या बांगड्या आणि पाचशे रुपये रोख लुटून नेले. काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील साई कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या नीता शिंदे या ६८ वर्षीय वृद्ध महिला शनिवारी भाजी खरेदी करून परत घरी जात होत्या. त्यावेळी दवाखाना कुठे म्हणून दोन अनोळखी व्यक्तींनी शिंदेंकडे विचारणा करत बोलण्यात गुंतवले.
एकाने सांगितले की, पंजाबी व्यक्तीस १० मुलींच्या नंतर मुलगा झाला आहे. त्यामुळे तो साड्या व पैसे वाटणार आहे. तुम्ही हातातील बांगड्या काढून पर्समध्ये ठेवून द्या म्हणत हात चलाखीने सोन्याच्या २ बांगड्या व पर्समधील ५०० रुपये रोख रक्कम, शिधापत्रिका लुटून पसार झाले. काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईडीची मोठी कारवाई! अविनाश भोसले यांची ४०.३४ कोटींची संपत्ती जप्त https://t.co/H2Cw4IgbKF@dir_ed
— Lokmat (@MiLOKMAT) June 21, 2021
१० वर्षाच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ नराधमांना अटक; आजीनं वेळीच आवाज ऐकला अन्...https://t.co/pNxuVhydol
— Lokmat (@MiLOKMAT) June 21, 2021