बाल बाल बच गई मैं !... दोन आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे वाचला महिलेचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 09:20 PM2018-07-24T21:20:49+5:302018-07-24T21:21:46+5:30

कांजूरमार्ग रेल्वे स्थानकांवरील चित्तथरारक घटना 

two RPF jawans survived the lady | बाल बाल बच गई मैं !... दोन आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे वाचला महिलेचा जीव

बाल बाल बच गई मैं !... दोन आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे वाचला महिलेचा जीव

Next

मुंबई - मध्य रेल्वेच्या कांजुरमार्ग रेल्वे स्थानकात आज दुपारी 3 वाजताच्यादरम्यान चित्तथरारक घटना घडली आहे. पूनम चेतन कलसानी (वय - २२) हि महिला फलाट क्रमांक २ वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमधून उतरताना त्यांच्या साडीचा पदर लोकलच्या दरवाज्याचा लॉकसाठी असलेल्या हुकात अडकला आणि दुदैवी घटना घडताना टळली. फरफटत गेलेल्या पूनम यांचा काळ आला पण वेळ आली नव्हती. त्या मोठ्या अपघातातून वाचल्या आहेत. 

पूनम हि महिला विक्रोळी येथे राहण्यास असून ती लोकलमधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने प्रवास करत होती. दरम्यान, कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर हि महिला उतरत असताना तिच्या साडीचा पदर लोकलच्या दरवाज्याच्या हुकात अडकला आणि फलाटावर फरफटत गेलेल्या या महिलेला लोकलखाली जाण्यापासून आरपीएफच्या जवानांनी वाचवले. या बहादूर जवानांचे नाव राजकमल  यादव आणि सुमितकुमार यादव असे आहे. या थरारक घटनेचे दृश्य रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. सुदैवाने या ठिकाणी कर्तव्यावर असलेले राजकमल यादव आणि सुमीतकुमार यादव यांनी फरफटत लोकलखाली जाणाऱ्या पूनम या महिलेला ओढून धरत लोकल खाली जाऊ दिले नाही आणि तिचा जीव वाचला आहे. या दोन जवानांना आणि महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. हि महिला सुरक्षित असून तिला घरी पाठविण्यात आले आहे. 

Web Title: two RPF jawans survived the lady

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.