सेल्फीच्या नादात दोन भावंडांचा बुडून मृत्यू; गोसेखुर्द प्रकल्पावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 08:19 PM2021-08-15T20:19:24+5:302021-08-15T20:20:08+5:30
Drowning Case : पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्दे विनोद मधुकर जुनघरे (३५) व मंगेश मधुकर जुनघरे (३७) रा. रेवतकर ले आऊट उमरेड जि. नागपूर असे मृतकांचे नाव आहेत.
पवनी(भंडारा) : गोसीखुर्द प्रकल्पाच्या पावर हाऊस पाण्याचे प्रवाहात उतरून सेल्फी काढत असताना दोन भावंडांचा घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजता घडली. विनोद मधुकर जुनघरे (३५) व मंगेश मधुकर जुनघरे (३७) रा. रेवतकर ले आऊट उमरेड जि. नागपूर असे मृतकांचे नाव आहेत. ते गोसेखुर्द प्रकल्पावर पर्यटनासाठी आले होते. पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.