बर्थडे पार्टीत दोघांवर चाकूने वार, मैत्रिणीच्या भावाने केला हल्ला; वाशीतली घटना 

By सूर्यकांत वाघमारे | Published: August 15, 2023 11:14 PM2023-08-15T23:14:35+5:302023-08-15T23:14:43+5:30

वाशी येथील रघुलीला मॉल परिसरात सोमवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

Two stabbed at birthday party, assaulted by girlfriend's brother; Incident in Vashi | बर्थडे पार्टीत दोघांवर चाकूने वार, मैत्रिणीच्या भावाने केला हल्ला; वाशीतली घटना 

बर्थडे पार्टीत दोघांवर चाकूने वार, मैत्रिणीच्या भावाने केला हल्ला; वाशीतली घटना 

googlenewsNext

नवी मुंबई : मध्यरात्रीच्या सुमारास वाशीत उघड्यावर सुरु असलेल्या बर्थडेच्या पार्टीत दोघांवर चाकूने वार झाल्याची घटना घडली आहे. बर्थडेसाठी आलेल्या एकावर त्याच्या मैत्रिणीच्या भावाने पाळत ठेवून हा हल्ला केला. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.

वाशी येथील रघुलीला मॉल परिसरात सोमवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. घणसोली येथील शुभम सरवैया याचा वाढदिवस असल्याने काहीजण त्याठिकाणी जमले होते. त्यामध्ये तुर्भेत राहणारा निजामुद्दीन खान हा देखील आला होता. दरम्यान त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या दोघांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्यामध्ये तो जखमी झाला असता रघुराव पै हा मदतीला धावला असता त्याच्यावर देखील दोघांनी वार करून पळ काढला होता. यामध्ये जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांनी वाशी पोलिसांकडे तक्रार केली.

गुन्हा दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सहायक निरीक्षक पवन नांद्रे, उपनिरीक्षक निलेश बारसे आदींचे पथक केले होते. त्यांनी हल्ला करणाऱ्यांची माहिती मिळवून काही तासातच त्यांना कोपर खैरणे परिसरातून अटक केली. हसन सिद्दीकी व युसूफ शहा अशी हल्ला करणाऱ्यांची नावे आहेत. त्यांनी निजामुद्दीन याच्यावर पाळत ठेवून हा जीवघेणा हल्ला केला. यासाठी त्यांनी वापरलेले दोन चाकू व वापरलेली कार पोलिसांनी हस्तगत केली आहे. निजामुद्दीन याची बहिणीसोबत असलेली मैत्री त्यांना खटकत असल्याने त्यातुन त्यांनी हा हल्ला केला. याप्रकरणी वाशी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Two stabbed at birthday party, assaulted by girlfriend's brother; Incident in Vashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.