बल्लारपुरात दुचाकीचोरांना ठोकल्या बेड्या, चार वाहने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 02:10 PM2021-05-18T14:10:41+5:302021-05-18T14:11:44+5:30

Crime News : ही वाहने आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. या वाहनांची किमत ७५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Two vehicles seized in Ballarpur, four vehicles seized | बल्लारपुरात दुचाकीचोरांना ठोकल्या बेड्या, चार वाहने जप्त

बल्लारपुरात दुचाकीचोरांना ठोकल्या बेड्या, चार वाहने जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देया कारवाईत आरोपी संतोष राठोड (१८) रा. काटा गेट, बल्लारपूरविरुध्द भादंविच्या कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बल्लारपूर(चंद्रपूर) : बल्लारपुरात चार दुचाकीसह तिघांना पोलिसांनीअटक केली आहे. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. बल्लारपूर पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तिघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केला असता त्यांनी दुचाकी वाहने चोरी केल्याची कबुली दिली. ही वाहने आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. या वाहनांची किमत ७५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


कळ्या रंगाची हिरो होंडा सिडी डिलक्स क्रमांक एमएच ३४ एसी ७१५७ किमत १५ हजार रुपये, कळ्या रंगाची हिरो पॅशन प्रो. एचएच ३४ एएल ६५७१ किमत २० हजार रुपये, कळ्या रंगाची होंडा ड्रीम युगा क्रमांक एमएच ३४ एएक्स ३६४८ किमत २५ हजार रुपये व लाल-कळ्या रंगाची हिरो होंडा सिडी डिलक्स एमपी ४५ एमबी ४४६७ किमत १५ हजार रुपये ही वाहने जप्त करण्यात आली. या कारवाईत आरोपी संतोष राठोड (१८) रा. काटा गेट, बल्लारपूरविरुध्द भादंविच्या कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांक्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड, पोलीस हवालदार आनंद परचाके, एन.पी.सी. सुधाकर वरघने, शरद कुडे, राकेश, पोलीस शिपाई अजय हेडाऊ, श्रीनिवास वाभिटकर, गणेश पुरढकर, शेखर माथनकर, महिला शिपाई संध्या आमटे, सीमा पोरते यांनी केली.

Web Title: Two vehicles seized in Ballarpur, four vehicles seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.