कारागृहात हे दोघे पुरवत होते पिस्तूल, पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 03:36 PM2020-09-02T15:36:23+5:302020-09-02T15:38:01+5:30

बंदी पलायन प्रकरण : आठ तारखेपर्यंत कोठडी

The two were supplying pistols to the jail, police arrested duo | कारागृहात हे दोघे पुरवत होते पिस्तूल, पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

कारागृहात हे दोघे पुरवत होते पिस्तूल, पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

googlenewsNext
ठळक मुद्देया गुन्ह्यात एक गावठी पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. मुख्य संशयित अजूनही फरारच आहेत. पुण्यातील कोथरुडमध्ये सोने विक्रीच्या दुकानात शस्त्रधारी दोघांनी दरोडा टाकला होता.

जळगाव : कारागृहात आरोपींना पिस्तुल व काडतूस पुरविणाऱ्या नागेश मुकुंदा पिंगळे (२१,रा.अमळनेर) व अमीत उर्फ नितेश सुदर्शन चौधरी उर्फ बिहारी (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव मुळ रा.बिहार) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ सप्टेबर रोजी सायंकाळी अटक केली. दरम्यान, या गुन्ह्यात एक गावठी पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. मुख्य संशयित अजूनही फरारच आहेत.


तपासाधिकारी बापू रोहोम यांनीसागर पाटीलसह १ रोजी अटक केलेल्या नागेश व अमीत चौधरी यांना बुधवारी आॅनलाईन न्यायालयात हजर केले असता तिघांना ८ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुशील मगरे व गौरव पाटील यांच्याबाबत सागर पाटील याच्याकडे चौकशी केली असता तो पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देवून वेळ मारुन नेत आहे. अमीत उर्फ बिहारी व जगदीश या दोघांनी गणेश नगराकडून कारागृहात भींतीवरुन काडतूस व पिस्तुल फेकून मगरे याला पुरविले आहे.शिंदखेडा येथील एका जणाने जगदीश पाटील याला गावठी पिस्तुल पुरविल्याचेही उघड झाले आहे.


पुण्यातील कोथरुडमध्ये सोने विक्रीच्या दुकानात शस्त्रधारी दोघांनी दरोडा टाकला होता. त्यात सुशील मगरे याच्यासोबत आता अटक केलेला अमीत उर्फ बिहारी हा देखील होता. अमीत हा मुळचा बिहारचा असून रामेश्वर कॉलनीत वडीलांसोबत इलेक्ट्रीक फिटींगचे काम करतो, मगरेच्या संपर्कात आल्याने धाडसी गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाला.

Web Title: The two were supplying pistols to the jail, police arrested duo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.