नवऱ्याला मारण्यासाठी दोन बायकांनी दिली सुपारी, मुलीने केले पैसे ट्रान्सफर; शूटरने सांगितली संपूर्ण कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 01:45 PM2022-07-18T13:45:05+5:302022-07-18T13:51:31+5:30
Murder Case : हा खून करणाऱ्या शुटरला पोलिसांनी अटक केली आहे.
दिल्लीतील गोविंदपुरी भागात ६ जुलैच्या रात्री डीटीसी बस चालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून मृताच्या मुलीसह दोन पत्नींना अटक करण्यात आली. हत्येनंतर दोन्ही पत्नींना मालमत्ता आपापसात वाटून घ्यायची होती. नजमापासून गीता झालेल्या दुसऱ्या पत्नीने या हत्येसाठी लहान भावाला 15 लाखांची सुपारी दिली होती. हा खून करणाऱ्या शुटरला पोलिसांनीअटक केली आहे. चौकशीत त्याने अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत.
चौकशीदरम्यान, शूटर नईमने पोलिसांना सांगितले की, त्याला मृताची पत्नी नजमा उर्फ गीता हिचा चुलत भाऊ इक्बाल याच्यामार्फत संजीव कुमारच्या हत्येसाठी सुपारी देण्यात आली होती. मृत संजीव कुमार याच्या मुलीने त्यांच्या खात्यात 20 हजार रुपये ट्रान्सफर केले होते. खून करण्यासाठी तो मित्र मनीषसोबत दिल्लीत आला होता. लाजपत नगरमध्ये राहणाऱ्या मनीषच्या चुलत भावाची दुचाकी घेऊन आला होता. 6 जुलै 2022 रोजी संजीवचा दुचाकीवरून पाठलाग करून दीपालय शाळेजवळ गोळ्या झाडण्यात आल्या. झारखंडमधील गोड्डा येथील जमुनी पहारपूर येथे राहणारा 38 वर्षीय नईम अन्सारी 9वीपर्यंत शिकला आहे. तो गुजरातमधील वलसाड येथे शिंपी म्हणून काम करत असे.
शूटर नईम दिल्लीतून झारखंडला पळून गेला होता
पोलिसांनी शूटर नईम अन्सारीच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले असता तो दिल्लीहून झारखंडला पळून गेल्याचे निष्पन्न झाले. टीम झारखंडला पोहोचली आणि मेहनतीनंतर नईमला पकडले. यावेळी ग्रामस्थांनी तेथे जमा होऊन छापा टाकणाऱ्या पथकाला घेराव घातला. त्यांनी आंदोलन सुरू करून बाहेर पडण्याचा मार्ग अडवला.
नईम अन्सारीची पोलिसांच्या ताब्यातून सुटका करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पथकातील सदस्यांनी गाड्या मागे वळवल्या. गावकऱ्यांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली, पण कोणतीही जीवितहानी न होता पथक बाहेर पडले.आरोपीला झारखंड न्यायालयातून ट्रान्झिट रिमांडवर घेऊन दिल्लीत आणण्यात आले.
डीटीसी बस चालक संजीव कुमार यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पहिली पत्नी ४२ वर्षीय गीता, २१ वर्षीय कोमल, २८ वर्षीय गीता देवी उर्फ नजमा गोविंदपुरी यांना पोलिसांनी पकडले होते. कोमल ही मृत संजीव यांची पहिली पत्नी गीता यांची मुलगी आहे.