पैशाच्या आमिषाने सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिला दलालांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 06:50 PM2022-02-04T18:50:51+5:302022-02-04T18:52:09+5:30
Sex Racket Case :चार पीडित तरुणींची सुटका, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई
ठाणे - पैशाच्या आमिषाने वागळे इस्टेट परिसरात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या रोशनी जैस्वाल (२४, रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. दादा पाटीलवाडी, ठाणे) आणि वहिदा शेख (२७, रा. मुंब्रा, ठाणे) या दोन महिला दलालांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. त्यांच्या तावडीतून चार पीडित तरुणींची सुटका केली.
वागळे इस्टेट परिसरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल तरुणींना पैशाचे आमिष दाखवून शरीर विक्रीसाठी रोशनीसह तीन महिला दलाल भाग पाडत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रद्धा कदम, रोशन कदम आणि पोलीस नाईक नितीन पाटील आदींच्या पथकाने ३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या मुंबई ठाणे पूर्व द्रुतगती मार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील हॉटेल मंत्र येथे कारवाई केली. त्यावेळी काही गिऱ्हाईकांसोबत पीडित महिलांना शरीर विक्रीस भाग पाडले जात असल्याचे आढळले.
शीना बोरा जिवंत आहे का? इंद्राणी मुखर्जीच्या दाव्यावर सीबीआय १४ दिवसांत करणार खुलासा
या कारवाईमध्ये २६ ते ३५ वयोगटातील चार तरुणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी तीन पैकी दोन महिला दलालांना शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अटक केली. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात कलम ३७० (२), तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) अधिनियम कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड अधिक तपास करीत आहेत.