ठाण्यातील मॉलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिला दलालांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 10:04 PM2022-07-28T22:04:56+5:302022-07-28T22:05:34+5:30

Sex Racket : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई: चार पिडित महिलांची सुटका

Two women brokers arrested for running a sex racket in a mall in Thane | ठाण्यातील मॉलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिला दलालांना अटक

ठाण्यातील मॉलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिला दलालांना अटक

googlenewsNext

ठाणे: असहाय महिलांना फूस लावून त्यांच्याकडून कापूरबावडी येथील एका मॉलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिला दलालांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली. त्यांच्या तावडीतून चार पिडित महिलांचीही सुटका केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी गुरुवारी दिली.

ठाणे शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून असहाय महिलांना फूस लावून त्यांना शरीर विक्रयासाठी काही दलाल महिला पाठवित असल्याची माहिती ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे २७ जुलै २०२२ रोजी कापूरबावडी सर्कल येथील सिटी मॉल येथे बोगस ग्राहक पाठवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह उपनिरीक्षक भगवान औटी, जमादार श्रद्धा कदम आणि दिवाळे आदींच्या पथकाने सापळा लावून दोन कथित दलाल महिलांना अटक केली. या छाप्यादरम्यान चार पीडित महिलांचीही सुटका करण्यात आली. या दोन्ही आरोपी महिलांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two women brokers arrested for running a sex racket in a mall in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.