सिडकोच्या कंत्राटदारासह दोन कामगारांचा ट्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 06:18 PM2019-01-09T18:18:46+5:302019-01-09T18:20:33+5:30
घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून स्थानिक नगरसेविका चारुशीला घरत आणि नगरसेवक अजय बहिरा हे देखील पोचले आहेत. त्यांनी या तिघांच्या मृत्यूस सिडकोला दोषी ठरविले आहे.
पनवेल - पनवेल परिसरातील काळुंद्रे गावात आज सायंकाळी एक धक्कादायक घडली आहे. गावातील एका ट्रेनेजमध्ये साफसफाईसाठी सिडकोचे तीन कामगार उतरले होते. दरम्यान, त्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सिडकोचा कंत्राटदार विलास म्हसकर आणि त्याच्या इतर दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. ट्रेनेजमध्ये तयार झालेल्या विषारी वायुत गुदमरुन ही घटना घडली.पनवेल महानगर पालिकेच्या अग्निशमंन दलाला घटनास्थळी पाचारण करुन तीघाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. हे ट्रेनेज ४० ते ५० फूट होते.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून स्थानिक नगरसेविका चारुशीला घरत आणि नगरसेवक अजय बहिरा हे देखील पोचले आहेत. त्यांनी या तिघांच्या मृत्यूस सिडकोला दोषी ठरविले आहे. कंत्राटदार विलास म्हसकर, कामगार संतोष वाघमारे आणि आणखी एका कामगाराची ओळख पटलेली नाही.